क्रिकेट पदाधिकाऱ्यांचे अधिकार गोठवले

पीटीआय
Friday, 16 March 2018

नवी दिल्ली - बीसीसीआय पदाधिकारी आणि सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेली प्रशासकीय समिती यांच्यातील ‘सामना’ वेगळ्या वळणावर आला आहे. प्रशासकीय समितीने बीसीसीआयच्या तिन्ही हंगामी पदाधिकाऱ्यांचे सर्व कार्यकारी अधिकार गोठवले आहेत.

हंगामी अध्यक्ष सीके खन्ना, सचिव अमिताभ चौधरी आणि खजिनदार अनिरुद्ध चौधरी यांचा लोढा समितीच्या शिफारशींतील मुद्द्यानुसार कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे त्यांना पदावरून दूर करा, अशी मागणी प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. आता एक पाऊल पुढे जात त्यांनी या तिघा पदाधिकाऱ्यांचे कार्यकारी अधिकार थांबवले आहेत.

हे अधिकार रोखल्यामुळे हे तिन्ही पदाधिकारी आता लोढा शिफारशींविरोधात न्यायालयीन लढाईसाठी होणारा खर्च बीसीसीआयच्या तिजोरीतून करता येणार नाही. तसेच प्रशासकीय समितीच्या परवानगीशिवाय या तिघांना बीसीसीआयच्या सभांसाठी प्रवास आणि निवासाची व्यवस्था करता येणार नाही.

विनोद राय यांनी स्वतःचे अधिकार वापरून खेळाडूंसाठी भरघोस वाढीची नवीन वेतनश्रेणी जाहीर केली आणि खेळाडूंबरोबरचा करारही निश्‍चित केला; पण त्यावर स्वाक्षरी करण्याचे अधिकार खजिनदार अनिरुद्ध चौधरींचे आहेत आणि ते स्वाक्षरी करण्यास तयार नाहीत. त्यामुळे विमा पॉलिसी रद्द होण्याच्या स्थितीत असल्यामुळे राय संतापले असल्याची चर्चा भारतीय क्रिकेट वर्तुळात केली जात आहे. बीसीसीआयच्या मार्केटिंग विभागाच्या सरव्यवस्थापकपदी एका ‘पेजथ्री’ पत्रकाराची जो सध्या चित्रपटनिर्मितीच्या एका कंपनीशी संबंधित आहे याच्या नियुक्तीस चौधरी यांनी आक्षेप घेतल्यामुळे हा वाद अधिक चिघळला असल्याचे सांगण्यात येत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news cricket BCCI