मुंबईचा महाराष्ट्रावर पहिल्या डावावर विजय

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 28 January 2018

पुणे - नडियाड येथे झालेल्या चौदा वर्षांखालील गटाच्या पश्‍चिम विभागीय साखळी क्रिकेट  स्पर्धेत मुंबईने अनिर्णीत सामन्यात महाराष्ट्राचा पहिला डावाच्या अधिक्‍यावर पराभव केला. 

संभूभाई पटेल मैदानावर झालेल्या तीन दिवसांच्या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना ३५० धावा केल्या. त्यात महत्त्वाचा वाटा वेदांत गादिया आणि मोहित तन्वरने केलेल्या शतकाचा होता. वेदांत गादियाने ३१९ मिनिटांच्या खेळात २५८ चेंडूत १६२ धावा केल्या. त्यात २८ चौकारांचा समावेश होता, तर मोहित तन्वरने १२७ मिनिटांच्या खेळात १३४ चेंडूत अठरा चौकारांसह १०० धावा केल्या.

महाराष्ट्राकडून तिलक जाधव आणि सचिन धसने प्रत्येकी चार गडी बाद केले. त्यानंतर महाराष्ट्राचा पहिला डाव ३३१ धावांत आटोपला व मुंबईने पहिल्या डावात २९ धावांची आघाडी मिळविली. महाराष्ट्राकडून आर्शीन कुलकर्णीने शतक, तर तिलक जाधवने केलेली अर्धशतकी खेळी अपुरी पडली. सलामीचा फलंदाज आर्शीन कुलकर्णीने २५८ मिनिटांच्या खेळात २२१ चेंडूत २४ चौकार व एक षटकारासह १३५ धावा केल्या, तर तिलक जाधवने २०९ मिनिटांच्या खेळात १७२ चेंडूत ५० धावा केल्या. त्यात आठ चौकारांचा समावेश होता. मुंबईकडून जुगराज मेहताने पाच गडी बाद केले. उरलेल्या वेळात मुंबईने दुसऱ्या डावात पाच बाद २५५ धावा केल्या. या वेळी आयुष  जेठावानेही शतक झळकाविले. आयुषने १४२ मिनिटांच्या खेळात १०७ चेंडूत १०५ धावा केल्या. त्यात १९ चौकारांचा समावेश होता. या सामन्यात मुंबईने पहिल्या डावातील आघाडीचे तीन गुण मिळविले. 

महाराष्ट्राचा दुसरा सामना उद्यापासून (ता. २८) बडोदा संघाबरोबर नडियाड येथे होत आहे.      

संक्षिप्त धावफलक -
मुंबई - पहिला डाव - (९८ षटकांत) सर्वबाद ३५० (वेदांत गादिया १६२, मोहित तन्वर १००, अमन तिवारी २४, तिलक जाधव ४-२४, सचिन धस ४-७९, यश बोरामणी  १-३२, अभिषेक निषाद १-४७) दुसरा डाव - (६५ षटकांत) ५ बाद २५५ (आयुष जेठावा  १०५, वेदांत गादिया ४१, राज देशमखा २९, मोहित तन्वर २८, आक्‍क्षन काझी २-३१, सचिन धस २-६३) अनिर्णीत विरुद्ध महाराष्ट्र - पहिला डाव - (१०९.२ षटकांत) सर्वबाद ३३१ (आर्शीन कुलकर्णी १३५, तिलक जाधव ५०, आक्‍शन काझी ३५, ओंकार राजपूत २७, सचिन धस २४, आदिनाथ प्रभाळकर २२, जुगराज मेहता ५-५३, वेदांत गादिया २-१९, आदित्य जाधव २-६९, जय धात्रक १-७१) 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news cricket competition