esakal | मधल्या फळीतील स्पर्धा ही संधी - श्रेयस
sakal

बोलून बातमी शोधा

shreyas iyer

मधल्या फळीतील स्पर्धा ही संधी - श्रेयस

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली - विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी अजून दीड वर्ष असले तरी मधल्या फळीत स्थान मिळवण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे. स्पर्धेत असलेल्या खेळाडूंपैकी एक, मुंबईकर श्रेयस अय्यर या शर्यतीकडे स्पर्धा म्हणून पाहत असल्याचे म्हणतो. भारतीय ‘अ’ संघातून खेळताना त्याने दक्षिण आफ्रिकेत चमकदार कामगिरी केली होती; परंतु मुख्य संघातून मिळालेल्या संधीचा तो फायदा घेऊ शकला नाही.

फलंदाजीतील क्रमवारीचा मी विचार करत नाही. संधी मिळताच सर्वोत्तम प्रदर्शन करण्याचाच मी विचार करत असतो. श्रेयस म्हणाला, ‘‘ज्या दोन सामन्यांत मला फलंदाजीची संधी मिळाली, त्या खेळपट्ट्या काहीशा वेगवान होत्या, पण गतवर्षी मी भारत ‘अ’ संघातून खेळताना याच खेळपट्ट्या काहीशा संथ होत्या. माझ्यासाठी हा अनुभव आहे.’’

loading image