भारताची सलामी आज ऑस्ट्रेलियाशी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 14 January 2018

माउंट मौनगानुई (न्यूझीलंड) - विश्‍वकरंडक युवा (१९ वर्षांखालील) क्रिकेट स्पर्धेत रविवारी भारतासमोर सलामीच्या लढतीत ऑस्ट्रेलियाचे आव्हान असेल. दोन्ही संघांत ‘भावी स्टार’ अशी गणना झालेले खेळाडू आहेत. त्यामुळे या लढतीची उत्कंठा शिगेस पोचली आहे.

तीन वेळा युवा जगज्जेता ठरलेला भारत यापूर्वी २०१४ मध्ये जिंकला होता. मागील स्पर्धेत भारत उपविजेता ठरला होता. अंतिम फेरीत वेस्ट इंडीजने भारताला हरविले होते. राहुल द्रविड प्रशिक्षक असलेल्या भारतीय संघात गुणवत्ता ठासून भरलेली आहे. भारतीय संघ येथे पुरेसा आधी दाखल झाला आहे. त्यामुळे त्यांनी हवामानाशी जुळवून घेतले आहे. 

द्रविड युवा आणि ‘अ’ संघाचे प्रशिक्षक म्हणून स्थिरावले आहेत. वैयक्तिक खेळाडूंवर लक्ष केंद्रित न करता सांघिक कामगिरीची चर्चा करण्यास द्रविड यांचे प्राधान्य असते. असे असले तरी कर्णधार पृथ्वी शॉ हा संघाचा आधारस्तंभ आहे. मुंबईच्या स्थानिक स्पर्धांसह रणजी करंडक लढतींमध्येही त्याने खोऱ्याने धावा केल्या आहेत. हिमांशू राणा हा आणखी एक चांगला फलंदाज आहे. त्याने एकदिवसीय सामन्यांत ठसा उमटविला आहे. पंजाबचा शुभम गील तिसऱ्या क्रमांकावर येईल. आकर्षक फलंदाजांमध्ये त्याची गणना होते. त्याने यंदा रणजी मोसमातही चांगली कामगिरी केल्यामुळे त्याचा आत्मविश्‍वास उंचावला आहे.

भारताच्या आव्हानात प्रमुख फलंदाजांची कामगिरी निर्णायक ठरेल. मध्य फळीची मदार अनुकूल रॉय आणि अभिषेक शर्मा यांच्यावर आहे. हे दोघेसुद्धा सर्वोत्तम कामगिरीसाठी सज्ज झाले आहेत. बंगालचा वेगवान गोलंदाज इशान पोरेल याचे नावसुद्धा गाज आहे. महंमद शमी राष्ट्रीय संघात असल्या कारणाने बंगालकडून फारसा खेळू शकत नाही. अशावेळी पोरेने संधीचा फायदा उठविला आहे.

पोरेल नव्या चेंडूवर प्रारंभ करेल. त्याला शिवम मावी याची तुल्यबळ साथ अपेक्षित आहे. हे दोघे वेगवान गोलंदाजीस अनुकूल खेळपट्ट्यांवर प्रभाव पाडण्यासाठी प्रयत्नशील राहतील. शुभमने विभागीय चॅलेंजर स्पर्धेत चार सामन्यांत नऊ विकेट टिपत निवड समितीचे लक्ष वेधून घेतले. तो उजव्या हाताने गोलंदाजी करतो. गेल्या वर्षी त्याच्या भेदक कामगिरीच्या जोरावर भारताने इंग्लंडला इंग्लंडमध्ये ‘व्हाईटवॉश’ दिला होता.

ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व जॅसन सांघा याच्याकडे आहे. त्यानेसुद्धा स्थानिक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलिया संघात माजी कर्णधार स्टीव वॉ यांचा मुलगा ऑस्टिन, क्रिकेट मंडळाचे ‘सीईओ’ जेम्स सुदरलॅंड यांचा मुलगा वील असे खेळाडू आहेत. त्यामुळे संघाचे आकर्षण वाढले आहे.

आमच्याकडे चांगला संघ असल्याचा विश्‍वास वाटतो. अलीकडे आम्ही चांगला खेळ केला आहे. या वयोगटातील प्रत्येक खेळाडू प्रतिभाशाली आहे. आम्हाला संघ म्हणून चांगली कामगिरी करण्याची संधी आहे. केवळ याच स्पर्धेत नव्हे, तर व्यावसायिक क्रिकेटमध्येसुद्धा चांगली कामगिरी करण्याची क्षमता त्यांच्यात आहे.
- राहुल द्रविड, युवा संघाचे प्रशिक्षक

आम्ही न्यूझीलंडमध्ये येऊन आठवडा झाला आहे. आमची तयारी चांगली झाली. आमचे ध्येय अर्थातच विश्‍वकरंडक जिंकण्याचे आहे, पण या घडीला आम्ही पहिल्या लढतीवर लक्ष केंद्रित केले आहे.
- पृथ्वी शॉ, भारताचा कर्णधार

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news cricket india australia