गोलंदाजांमुळे दक्षिण आफ्रिकेला संधी

Wednesday, 17 January 2018

सेंच्युरियन - खेळपट्टीचे स्वरूप लक्षात घेऊन सावध खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाला दुसऱ्या कसोटीत गोलंदाजांच्या कामगिरीमुळे विजयाची संधी निर्माण झाली आहे. विजयासाठी २८७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची अवस्था ३ बाद ३५ अशी झाली होती. त्या वेळी चेतेश्‍वर पुजारा ११, तर पार्थिव पटेल ५ धावांवर खेळत होता. 

दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव २५८ धावांवर संपुष्टात आला. डिव्हिलर्स आणि डीन एल्गर यांनी अर्धशतकी खेळी केली. शमीने चार, बुमराने तीन गडी बाद केले. 

विजयासाठी २८७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला मुरली विजय आणि लोकेश राहुल चांगली सलामी देण्यात अपयशी ठरले. विजयचा खाली राहिलेल्या चेंडूवर त्रिफळा उडाला, तर राहुल चेंडूच्या गतीवर फसला. कोहली-पुजारा या जोडीवर भारताच्या आशा असताना पहिल्या डावातील शतकवीर विराट कोहलीही अपयशी ठरला. पहिलाच कसोटी सामना खेळणाऱ्या एन्गिडीच्या वेगवान इनस्विंगवर कोहली पायचीत झाला. कोहली बाद झाल्यावर संघ व्यवस्थापनाने रोहित शर्माच्या जागी पार्थिव पटेलला बढती दिली. त्याने पुजाराच्या साथीत अखेरपर्यंत तग धरला. आता उद्या अखेरच्या दिवशी दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांबरोबर भारतीय फलंदाजांसमोर खेळपट्टीच्या विचित्र स्वरूपाचे आव्हान असेल. खेळपट्टीवर चेंडू कधी खाली राहतो, तर मध्येच तो  उसळी घेतोय.

त्यापूर्वी, दक्षिण आफ्रिका संघाने खेळपट्टीचे एकूण स्वरूप लक्षात घेता सावधपणा बाळगूनच फलंदाजी केली. त्यामुळेच आघाडी दोनशेच्या वर गेल्यानंतरही त्यांनी फारकी आक्रमकता दाखवली नाही.दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज लय मिळविण्यासाठी चाचपडत असतानाच डिव्हिलर्सने पुन्हा एकदा आपले मोठेपण सिद्ध केले. त्याची सहज फटकेबाजी हेच दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावाचे वैशिष्ट्य ठरले. त्याने डीन एल्गरसोबत तिसऱ्या विकेटसाठी १४१ धावांची भागीदारी केली. त्यानंतरही भारताच्या महंमद शमीने न कचरता गोलंदाजी करून सकाळच्या सत्रात दक्षिण आफ्रिका संघाला तीन धक्के दिले. दिवसाचे दुसरे सत्र मात्र कंटाळवाणे ठरले. दक्षिण आफ्रिका संघ विजयाच्या प्रयत्नांना महत्त्व न देता आघाडी वाढवून सामना अनिर्णित अवस्थेकडे कसा जाईल, याच हेतूने खेळत होते. या दुसऱ्या सत्रात २७ षटकांत केवळ ५४ धावा निघाल्या. चहापानाच्या ७ बाद २३० अशा स्थितीनंतर तिसऱ्या सत्राच्या सुरवातीला दहा षटकांतच दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव २५८ धावांत आटोपला. 

संक्षिप्त धावफलक ः
दक्षिण आफ्रिका ः३३५ आणि दुसरा डाव २५८ (एल्गर ६१, डिव्हिलर्स ८०, डू प्लेसिस ४८, शमी ४-४९, बुमरा ३-७०, ईशांत २-४०) भारत ३०७ आणि १६.१ षटकांत ३ बाद ३५ (पुजारा खेळत आहे ११, पटेल खेळत आहे ५, लुंगी एन्गिडी २-१४).

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news cricket india south africa Centurion