गोलंदाजाच्या डोक्‍याला लागून षटकार

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 22 February 2018

ऑकलंड (न्यूझीलंड) - गोलंदाजांच्या डोक्‍यावरून, तर कधी पंचांच्या डोक्‍यावरून मारलेला हा उत्तुंग फटका आणि षटकार...समालोचन करताना असे वर्णन नेहमीच ऐकायला मिळते; मात्र फलंदाजाने मारलेला हा फटका गोलंदाजाच्या डोक्‍याला लागला आणि षटकार असे वर्णन बुधवारी नुसते ऐकायलाच मिळाले नाही, तर बघायलाही मिळाले. 

न्यूझीलंडमधील एका स्थानिक सामन्यात ही घटना घडली. ऑकलंड आणि कॅंटरबरी यांच्यात हा फॉर्ड करंडकासाठी अंतिम सामना सुरू होता. ऑकलंडची फलंदाजी सुरू असताना १९व्या षटकात फलंदाज जीत रावल याने गोलंदाज ॲण्ड्रयू एलिस याच्या चेंडूवर जोरदार फटका मारला. चेंडू गोलंदाज एलिसच्या डोक्‍याला लागला. चेंडूचा वेग इतका होता की चेंडू एलिसच्या डोक्‍याला लागून थेट सीमारेषेबाहेर गेला. पंचांनी प्रथम चौकार दिला; मात्र तिसऱ्या पंचाच्या निर्णयानंतर त्यांनी तो षटकार दिला.

एलिसला लगावलेला रावलचा हा दुसरा षटकार होता. घटनेनंतर रावलने एलिसच्या जवळ जाऊन त्याची विचारपूस केली. एलिस काही वेळ ड्रेसिंगरूममध्ये गेला. चेक-अप केल्यावर त्याला तंदुरुस्त ठरवण्यात आले. एलिस पुन्हा मैदानात आला आणि नंतर त्याने सहा षटके गोलंदाजी करून दोन गडी बाद केले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि तो चांगलाच लोकप्रिय झाला. रावलने १५३ चेंडूंत १० चौकार आणि चार षटकारांसह १४९ धावांची खेळी केली. त्याच्याच खेळीच्या जोरावर ऑकलंड संघाने ६ बाद ३०४ धावा केल्या. प्रतिस्पर्धी संघ ३७.२ षटकांत १९७ धावांत आटोपला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news cricket match