तिसऱ्या सामन्यात किवींविरुद्ध पाकिस्तानचा ७४ धावांत खुर्दा

पीटीआय
रविवार, 14 जानेवारी 2018

ड्युनेडीन - न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात पाकिस्तानचा ७४ धावांत खुर्दा उडाला. किवींचा डाव ५०व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर २५७ धावांत संपला. केन विल्यम्सनने ७३, तर रॉस टेलरने ५२ धावा केल्या. पाकची एकवेळ त्यांची ६ बाद १६ अशी स्थिती झाली होती; पण दहाव्या क्रमांकावर महंमद आमीरने १४, तर ११व्या क्रमांकावर रुम्मन रईसने सर्वाधिक १६ धावा केल्या. ट्रेंट बोल्टने १७ धावांत पाच विकेट टिपल्या. किवींनी सलग तिसऱ्या विजयासह पाच लढतींच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली.

Web Title: sports news cricket new zealand vs pakistan