अफगाणिस्तानला रोखत ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 30 January 2018

ख्राईस्टचर्च - अफगाणिस्तानची स्वप्नवत घोडदौड रोखत ऑस्ट्रेलियाने युवा विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. सोमवारी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने त्यांच्यावर सहा गडी राखून विजय मिळविला.

प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने १८१ धावांची मजल मारली. ऑस्ट्रेलियाने ३७.३ षटकांत ४ बाद १८२ धावा केल्या. यष्टिरक्षक फलंदाज इक्रम अली खिल याने ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजीचा सामना करताना ११९ चेंडूंत ८० धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून एडवर्डसने ७२ धावा करून संघाचा विजय सुकर केला.

संक्षिप्त धावफलक -
अफगाणिस्तान ४८ षटकांत सर्वबाद १८१ (इक्रम अली खिल ८०, जोनाथन मेर्लो ४-२४, झॅक इव्हन्स २-२६) पराभूत वि. ऑस्ट्रेलिया ३७.३ षटकांत ४ बाद १८२ (जॅक एडवर्डस ७२, परम उप्पल नाबाद ३२, नॅथन मॅकस्वीनी नाबाद २२)

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news cricket news austrolia afghanistan