भारत-विंडीजमध्ये आज टी-20 मुकाबला

वृत्तसंस्था
रविवार, 9 जुलै 2017

किंग्जस्टन (जमैका) : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात रविवारी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट मुकाबला होत आहे. एकदिवसीय मालिकेत विंडीज संघात काही अनोळखी चेहरे दिसले असले तरी टी-20 संघात ख्रिस गेल, किएरॉन पोलार्ड असे दिग्गज खेळाडू असल्यामुळे हा एकमेव सामना चुरशीचा होण्याची अपेक्षा आहे. 

किंग्जस्टन (जमैका) : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात रविवारी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट मुकाबला होत आहे. एकदिवसीय मालिकेत विंडीज संघात काही अनोळखी चेहरे दिसले असले तरी टी-20 संघात ख्रिस गेल, किएरॉन पोलार्ड असे दिग्गज खेळाडू असल्यामुळे हा एकमेव सामना चुरशीचा होण्याची अपेक्षा आहे. 

भारताने वन-डे मालिकेसाठी निवडलेला संघ टी-20साठी कायम ठेवला आहे. विंडीजने मात्र गेल, पोलार्ड यांच्यासह मार्लन सॅम्युएल्स, सुनील नारायण आणि कर्णधार कार्लोस ब्राथवेट यांना स्थान दिले आहे. या ओळखीच्या चेहऱ्यांमुळे मैदानावर वेगळीच रंगत अनुभवायला मिळणार आहे. टी-20 जगतातील या अनुभवी खेळाडूंमुळे भारताला विजयासाठी कष्ट करावे लागतील, परंतु आयपीएलच्या निमित्ताने एकमेकांसोबत किंवा विरोधात हे खेळाडू खेळलेले असल्यामुळे एकमेकांच्या ताकदीचा आणि क्षमतेचा चांगला अंदाज त्यांना आहे. 

आयपीएलमध्ये गेलचे नाणे चालले नव्हते, मात्र तो मायदेशात ठसा उमटवण्यास सज्ज असेल. त्याच्यासह पोलार्डवर यजमानांच्या फलंदाजीची भिस्त असेल. गोलंदाजीत जेर्मी टेलर त्यांचे आक्रमण सुरू करणार असला तरी सुनील नारायण आणि सॅम्युअल बद्री यांची फिरकी भारताला किती त्रासदायक ठरते हे महत्त्वाचे असेल. 

नुकत्याच संपलेल्या एकदिवसीय मालिकेत अजिंक्‍य रहाणे सर्वोत्तम ठरला असला तरी उद्या त्याला विश्रांती दिली जाऊ शकते. त्याच्याऐवजी ऋषभ पंतला संधी मिळण्याची शक्‍यता आहे. रोहित शर्मा संघात नसल्यामुळे विराट आयपीएलप्रमाणे सलामीला खेळू शकतो. त्यानंतर मधल्या फळीत युवराज, धोनी, केदार जाधव आणि हार्दिक पंड्या असे फलंदाज असतील. गोलंदाजीत कुलदीप यादवऐवजी अश्‍विनला संधी मिळू शकते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news cricket news BCCI Team India India versus West Indies