कृणाल पांड्या, बसिल थम्पी यांना भारतीय 'अ' संघात स्थान

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 जून 2017

पुढील महिन्यात 26 जुलैपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यासाठी मनीष पांडे आणि करुण नायर हे दोन कर्णधार असतील. या दौऱ्यामध्ये तिरंगी मालिका होणार आहे. यात ऑस्ट्रेलियाचा 'अ' संघ सहभागी होईल. या मालिकेसाठी पांडे कर्णधार असेल. तिरंगी मालिकेनंतर भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या 'अ' संघांमध्ये ऑगस्टमध्ये प्रत्येकी चार दिवसांचे दोन सामने होणार आहेत. यात भारताचे नेतृत्व नायर करेल. 

मुंबई : गेल्या 'आयपीएल'मध्ये भन्नाट सूर गवसलेल्या कृणाल पांड्या आणि बसिल थम्पी यांनी भारतीय 'अ' संघामध्ये स्थान पटकाविले आहे. पुढील महिन्यात भारतीय 'अ' संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठीच्या 16 जणांच्या संघात पांड्या आणि थम्पी यांना संधी मिळाली आहे. 

गेल्या 'आयपीएल'मध्ये कृणाल पांड्या मुंबई इंडियन्सकडून तर थम्पी गुजरात लायन्सकडून खेळला होता. 'आयपीएल'मध्ये प्रथमच खेळताना थम्पीने 11 गडी बाद केले होते. सातत्याने अचूक यॉर्कर टाकण्याच्या त्याच्या क्षमतेने तज्ज्ञांचे लक्ष वेधून घेतले होते. तिसऱ्यांदा 'आयपीएल'चे विजेतेपद पटकाविणाऱ्या मुंबईच्या यशात पांड्याच्या कामगिरीचा मोलाचा वाटा होता. त्याने 135 च्या स्ट्राईक रेटने 243 धावा केल्या. तसेच, दहा गडीही बाद केले. 

पुढील महिन्यात 26 जुलैपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यासाठी मनीष पांडे आणि करुण नायर हे दोन कर्णधार असतील. या दौऱ्यामध्ये तिरंगी मालिका होणार आहे. यात ऑस्ट्रेलियाचा 'अ' संघ सहभागी होईल. या मालिकेसाठी पांडे कर्णधार असेल. तिरंगी मालिकेनंतर भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या 'अ' संघांमध्ये ऑगस्टमध्ये प्रत्येकी चार दिवसांचे दोन सामने होणार आहेत. यात भारताचे नेतृत्व नायर करेल. 

तिरंगी मालिकेसाठी भारतीय 'अ' संघ : 
मनीष पांडे (कर्णधार), मनदीपसिंग, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, दीपक हुडा, करुण नायर, कृणाल पांड्या, रिषभ पंत (यष्टिरक्षक), विजय शंकर, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, जयंत यादव, बसिल थम्पी, महंमद सिराज, शार्दूल ठाकूर, सिद्धार्थ कौल. 

चार दिवसीय सामन्यांसाठी भारतीय 'अ' संघ : 
करुण नायर (कर्णधार), प्रियांक पांचाळ, अभिनव मुकुंद, श्रेयस अय्यर, अंकित बावणे, सुदीप चॅटर्जी, ईशान किशन (यष्टिरक्षक), हनुमा विहारी, जयंत यादव, शाहबाझ नदीम, नवदीप सैनी, महंमद सिराज, शार्दूल ठाकूर, अनिकेत चौधरी, अंकित राजपूत.

Web Title: sports news cricket news BCCI Team India Krunal Pandya