क्रिकेट: तमिम इक्‍बालचे शतक; बांगलादेश 6 बाद 305 

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 जून 2017

लंडन : सलामीवीर तमिम इक्‍बालच्या धडाकेबाज शतकाच्या जोरावर चॅंपियन्स करंडक स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात बांगलादेशने आज (गुरुवार) यजमान इंग्लंडसमोर 306 धावांचे आव्हान ठेवले. इक्‍बालने 142 चेंडूंत 128 धावा केल्या. 

इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गनने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. इक्‍बाल आणि सौम्या सरकार या बांगलादेशच्या सलामीवीरांना इंग्लंडच्या गोलंदाजांनी सुरवातीला जखडून ठेवले होते. पहिल्या 11 षटकांत बांगलादेशला 56 धावाच करता आल्या. याच धावसंख्येवर सौम्या सरकार बाद झाला. त्यानंतर इमरूल कैसही फार कमाल न करता बाद झाला. 

20 षटकांत दोन बाद 95 अशा स्थितीमध्ये इक्‍बाल आणि यष्टिरक्षक मुशफिकूर रहीम ही जोडी जमली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 166 धावांची भागीदारी केली. रहीमने 72 चेंडूंत 79 धावा केल्या. या दोघांनी इंग्लंडच्या गोलंदाजांना फार संधी मिळू दिली नाही. ही जोडी 45 व्या षटकात फुटली. त्यावेळी बांगलादेशची धावसंख्या 3 बाद 261 अशी झाली होती. शकीब अल हसन (10), शब्बीर रहमान (24) यांनी धावगती उंचावण्याचा प्रयत्न केला. 

या सामन्यापूर्वी ऐनवेळी संघात बदल करत इंग्लंडने फिरकी गोलंदाज आदिल रशीदऐवजी वेगवान गोलंदाज जेक बॉलला स्थान दिले. अष्टपैलू बेन स्टोक्‍स जखमी असल्याने त्याच्या गोलंदाजीविषयी कर्णधार मॉर्गन साशंक असल्याने हा बदल करण्यात आला. स्टोक्‍सने आज सात षटकेच गोलंदाजी केली. यात त्याने 42 धावा देत एक गडी बाद केला. 

धावफलक: 
बांगलादेश : 50 षटकांत 6 बाद 305 

तमिम इक्‍बाल 128, सौम्या सरकार 28, मुशफिकूर रहीम 79, शब्बीर रहमान 24 
लियाम प्लंकेट 10-0-4-59

Web Title: Sports News Cricket News Champions Trophy England versus Bangladesh