फाफ डू प्लेसिस भारताविरुद्धच्या मालिकेस मुकणार

वृत्तसंस्था
Saturday, 3 February 2018

फाफ डू प्लेसिसच्या बोटाला पहिल्या सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. त्याला या दुखापतीतून सावरण्यासाठी सहा आठवड्यांचा वेळ लागणार आहे. त्यामुळे तो भारताविरुद्धच्या एकदिवसीय व ट्वेंटी-20 मालिकेत खेळू शकणार नाही. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील सुरवातीच्या सामन्यातही तो खेळू शकण्याची शक्यता कमी आहे.

जोहान्सबर्ग - बोटाच्या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डू प्लेसिस भारताविरुद्धच्या एकदिवसीय व ट्वेंटी-20 मालिकेत खेळू शकणार नाही.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतही त्याच्या समावेशाबाबत संभ्रम आहे.
भारताला कसोटी मालिकेत फाफच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिका संघाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. भारताने कसोटी मालिका 2-1 अशी गमाविल्यानंतर एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या सामन्यात विजय मिळवित सहा सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. 

दक्षिण आफ्रिका व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, फाफ डू प्लेसिसच्या बोटाला पहिल्या सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. त्याला या दुखापतीतून सावरण्यासाठी सहा आठवड्यांचा वेळ लागणार आहे. त्यामुळे तो भारताविरुद्धच्या एकदिवसीय व ट्वेंटी-20 मालिकेत खेळू शकणार नाही. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील सुरवातीच्या सामन्यातही तो खेळू शकण्याची शक्यता कमी आहे. फाफच्या जागी संघात फरहान बेहारदीन याचा समावेश करण्यात आला आहे. तसेच जखमी एबी डिव्हिलर्सच्या जागी हेनरीच क्लासेन याला स्थान देण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news cricket news Faf Du Plessis out of India series with fractured finger