esakal | भारत-पाक आज आमने-सामने
sakal

बोलून बातमी शोधा

Cricket

प्रत्येक सामन्याची पूर्वतयारी महत्त्वाची असते, मग ती लढत कोणाविरुद्धही असो. ही लढत खेळत नसलेल्यांसाठी जास्त महत्त्वाची असते. उपांत्य लढत असल्यामुळेच हा सामना महत्त्वाचा आहे, 
- राहुल द्रविड, भारतीय मार्गदर्शक

भारत-पाक आज आमने-सामने

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

ख्राईस्टचर्च - भारताचा आफ्रिकेविरुद्धचा कसोटी विजय, आयपीएल लिलाव, पाकिस्तानची ट्‌वेंटी २० च्या जागतिक क्रमवारीतील अव्वल झेप यामुळे कदाचित भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत असूनही त्याचे फारसे वातावरण क्रिकेट जगतातही झालेले नाही. विश्वकरंडक कुमार क्रिकेट स्पर्धेतील या उपांत्य लढतीच्या वेळी दोन्ही संघांतील पारंपरिक संघर्षापेक्षा खेळाची चर्चा जास्त होईल, अशीच चिन्हे सध्या तरी दिसत आहेत.

लढतीचा तणाव काही प्रमाणात असल्यास तो कमी करण्यास हेगले ओव्हल मैदानाभोवतीचे निसर्गसौंदर्य नक्कीच साह्य करेल. भारत आणि पाकिस्तानच्या सलामीच्या प्रतिस्पर्ध्यात पहिली उपांत्य लढत झाली. भारताने सहज पराजित केलेल्या ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरी गाठली, तर पाकिस्तानला धक्का देऊन लक्ष वेधलेल्या अफगाणिस्तानला हार पत्करावी लागली. भारत-पाक लढतींचा इतिहास लक्षात घेतल्यास ही गणिते येथे फोल ठरतात.
आपली कोंडी केल्यास अजूनही आपण नखे काढतो, हे पाकिस्तानने श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय मिळवताना दाखवले. तर भारताने प्रतिस्पर्ध्यांना प्रतिकाराची फारशी संधीही दिलेली नाही. शाहीन आफरिदी आणि महम्मद मुसा हे पाकचे मध्यमगती गोलंदाज वर्चस्व गाजवतात की आयपीएलचा लिलाव गाजवलेले शिवम मावी आणि कमलेश नागरकोटी याचेही उत्तर मिळणार आहे. भारत-पाक लढत ही पाकचे जलदगती गोलंदाज आणि भारतीय फलंदाज यांच्यातील नसेल हे शिवम आणि कमलेशने दाखवले आहे.

भारत-पाक युवक
१९ वर्षांखालील गटात आतापर्यंत २१ सामने
भारताचे १२ विजय, ८ पराभव, एक टाय
यातील एक पराभव २००४ विश्‍वकरंडक अंतिम फेरीत
२०१४ मधील स्पर्धेत संजू सॅमसनच्या खेळीने भारताचा विजय
भारत तीनदा विजेते (२०००, २००८, २०१२), पाकिस्तान दोनदा विजेते (२००४, २००६)

loading image