महिला क्रिकेटमध्ये मितालीचे 'राज'; सर्वाधिक धावांचा उच्चांक

वृत्तसंस्था
गुरुवार, 13 जुलै 2017

दृष्टिक्षेपात 
सामने : 183 
डाव : 164 
धावा : 6028 
सर्वोच्च धावसंख्या ः 114 नाबाद 
शतके : 5 
अर्धशतके : 49 

ब्रिस्टॉल (इंग्लंड) : भारताची कर्णधार मिताली राज हिने महिला वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विश्वविक्रम नोंदविला. तिने इंग्लंडच्या शार्लोट एडवर्डस हिचा 5992 धावांचा उच्चांक मागे टाकला. विश्वकरंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिने सहा हजार धावांचा टप्पा सुद्धा पार केला. 

मितालीने 69 धावांची खेळी केली. 34 वर्षांची मिताली हैदराबादची रहिवासी आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत ती पहिल्या चेंडूवर शून्यावर बाद झाली होती. या लढतीत तिने कामगिरी उंचावली. शार्लोटचा उच्चांक मागे टाकण्यासाठी तिला 34 धावांची गरज होती. शार्लोटला या कामगिरीसाठी 180 डाव लागले. त्या तुलनेत मितालीने 16 डाव कमी घेतले. वन-डेमधील तिची सरासरी 51.52 आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार मेग लॅनिंग हिचीच सरासरी पन्नासपेक्षा जास्त आहे. मितालीला यंदा विलक्षण फॉर्म गवसला आहे. तिने सलग सात अर्धशतकांचा उच्चांकही अलीकडेच केला होता. वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेटचा विश्वविक्रम मितालीची सहकारी झूलन गोस्वामी हिने अलीकडेच केला. 

मितालीचे 'राज' 
विश्‍वकरंकड क्रिकेट स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यादरम्यान बुधवारी फटका खेळताना भारताची कर्णधार मिताली राज तिने महिला वन-डे क्रिकेटमध्ये सहा हजार धावांचा टप्पा पार करताना सर्वाधिक धावांचा विश्वविक्रम नोंदविला. 

विश्‍वकरंडकातील पाचवे शतक 
महिला विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत शतक झळकाविणारी पूनम राऊन भारताची पाचवी महिला खेळाडू ठरली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताकडून वीस शतके झाली असून, यात सर्वाधिक पाच शतके मिताली राज हिची आहेत. एकदिवसीय क्रिकेटमधील पूनमचे हे दुसरे शतक ठरले. यापूर्वी तिने आयर्लंडविरुद्ध नाबाद 109 धावांची खेळी केली होती. विश्‍वकरंडक स्पर्धेत शतक झळकाविणाऱ्या भारतीय खेळाडू : थिरुष कामिनी (100, वि. वेस्ट इंडीज, 31 जानेवारी 13), हरमनप्रीत कौर (नाबाद 107, वि. इंग्लंड, 3 फेब्रुवारी 13), मिताली राज (नाबा0 103, वि. पाकिस्तान, 7 फेब्रुवारी 13), स्मृती मानधना (नाबाद 106, वि. विंडीज, 29 जून 17), पूनम राऊत (106, वि. ऑस्ट्रेलिया, 12 जुलै 17)
(संकलन : गंगाराम सपकाळ)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news cricket news mitali raj world record most runs indian women cricket