esakal | शुभमान गिलने मोडले अनेक विक्रम; वडीलांकडून कौतुक
sakal

बोलून बातमी शोधा

Shubham Gill

भारताने आज (मंगळवार) झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पाकिस्तानचा 203 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला असून, अंतिम फेरीत भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ही कामगिरी केली असून, आतापर्यंत झालेल्या एकोणीस वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेत अंतिम फेरी गाठण्याची भारताची ही सहावी वेळ आहे.

शुभमान गिलने मोडले अनेक विक्रम; वडीलांकडून कौतुक

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली - एकोणीस वर्षांखालील विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध मिळविलेल्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या शुभमान गिलने अनेक विक्रम मोडीत काढले. या कामगिरीबद्दल त्याच्या वडीलांनी त्याचे कौतुक केले आहे.

भारताने आज (मंगळवार) झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पाकिस्तानचा 203 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला असून, अंतिम फेरीत भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ही कामगिरी केली असून, आतापर्यंत झालेल्या एकोणीस वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेत अंतिम फेरी गाठण्याची भारताची ही सहावी वेळ आहे. शुभमानच्या या कामगिरीवर बोलताना त्याचे वडील लखविंदर गिल यांनी म्हटले आहे, की शुभमानने आज देशाचे नाव मोठे केले. मला त्याच्याबद्दल अभिमान आहे. 

शुभमान गिलने केलेले विक्रम पुढीलप्रमाणे :

  • यंदाच्या एकोणीस वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेत शतक बनविणारा शुभमान ठरला पहिला भारतीय खेळाडू
  • भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत या स्पर्धांमध्ये झालेल्या सामन्यांमध्ये शतक करणारा शुभमान पहिला
  • यापूर्वी सलमान बटने सर्वाधिक 85 धावा केल्या होत्या 2002 मध्ये
  • एकोणीस वर्षांखालील विश्वकरंडकात वेगवान शतक झळकाविणाऱ्यांच्या यादीत शुभमानला तिसरे स्थान
  • सर्वात वेगवान शतकाचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर, त्याने 2008 मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध 73 चेंडूत केले होते शतक
  • भारताने सहाव्यांदा एकोणीस वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला, यापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान पाच वेळा अंतिम फेरीत गेलेली आहे
loading image