पाकिस्तानविरुद्ध आज उपांत्य सामना

पीटीआय
बुधवार, 14 जून 2017

कार्डिफ - बहुराष्ट्रीय एकदिवसीय स्पर्धेत पहिल्यावहिल्या विजेतेपदाच्या शोधात असलेले इंग्लंड आता दोन सामने दूर आहे. यातील पहिला अडथळा त्यांना आज (ता. १४) पार करावा लागणार आहे. चॅंपियन्स करंडक स्पर्धेत आज होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्यांचे पारडे जड आहे. तरीही त्यांना सावधगिरी बाळगावी लागणार आहे.

विश्‍वकरंडक स्पर्धांच्या अंतिम सामन्यात तीन वेळा खेळणाऱ्या इंग्लंडला गेल्या ४२ वर्षांत विजेतेपदाने हुलकावणी दिलेली आहे. सर्व प्रमुख देशांचा सहभाग असलेल्या चॅंपियन्स स्पर्धेसाठी त्यांना यंदा अधिक पसंती दिली जात आहे. 

इऑन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली खेळणारा इंग्लंडचा संघ समतोल आहे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यांचे सर्व खेळाडू फॉर्मातही आहेत. गतवेळच्या म्हणजेच २०१५ मध्ये ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये झालेल्या विश्‍वकरंडक स्पर्धेत पहिल्या फेरीतच आव्हान संपुष्टात आल्यानंतर इंग्लंडने कमालीची प्रगती केली आहे. 

ॲलेक्‍स हेल्स आणि जॅसन रॉय या सलामीवीरांना अपेक्षित धावा करता आल्या नसल्या तरी ज्यो रुट, मॉर्गन, स्टोक्‍स्‌ आणि बटलर अशी त्यांची मधली फळी भक्कम आहे. कालच्या सामन्यात पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनी श्रीलंकेच्या मधल्या फळीला सुरुंग लावणारी कामगिरी केली होती; परंतु उद्याच्या सामन्यातील लढाई त्यांच्यासाठी सोपी नसेल. जुनेद खान, महंमद आमेर, हसन अली या पाकिस्तानी वेगवान गोलंदाजांना इंग्लिश फलंदाजीसमोर शर्थीचे प्रयत्न करावे लागतील. फलंदाजीप्रमाणे इंग्लंडची गोलंदाजीही तेवढीच सक्षम आहे. जॅक बॉल, लिएम प्लंकेट आणि मार्क वूड हे मॉर्गनचे हुकमी एक्के आहे. गुडघा दुखापतीनंतर संघात परतणारा वूड ताशी ९० किमी वेगाने चेंडू टाकत आहे. इंग्लंडच्या अशा वेगवान माऱ्याचा सामना करण्याचे आव्हान पाकिस्तानी फलंदाजांसमोर असेल.

इंग्लंडचा संघ भक्कम आहे. दोन वर्षांपासून ते अधिक चांगले क्रिकेट खेळत आहेत. अशा बलाढ्य संघाबरोबर खेळायचे असेल, तर आम्हाला अधिक सकारात्मक खेळ करावा लागेल.
- सर्फराज अहमद,  पाकिस्तान कर्णधार.

Web Title: sports news cricket pakistan vs england