शॉची विक्रमी खेळी;इंडिया रेड ५ बाद ३१७

पीटीआय
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

लखनौ - मुंबईचा पृथ्वी शॉ आणि दिनेश कार्तिक यांच्या शतकी खेळीच्या जोरावर दुलीप करंडक अंतिम फेरीच्या लढतीत सोमवारी पहिल्या दिवशी इंडिया रेड संघाने ५ बाद ३१७ धावांची मजल मारली. खेळ थांबला तेव्हा ईशान जग्गी ९ धावांवर खेळत होता. 

प्रथम फलंदाजी करताना इंडिया रेडची सुरवात निराशाजनक झाली. अखिल हेरवाडकर आणि सूर्यकुमार यादव हे लवकर बाद झाले. त्या वेळी एकत्र आलेल्या पृथ्वी शॉ आणि दिनेश कार्तिक यांनी ‘ग्रीन’च्या गोलंदाजांना निष्प्रभ केले. या जोडीने २११ धावांची भागीदारी करताना आपली शतके साजरी केली.

पृथ्वीची खेळी विक्रमी ठरली. गेल्या मोसमात ‘रणजी’ पदार्पण करताना शतक ठोकणाऱ्या पृथ्वीने आज ‘दुलीप’ स्पर्धेतही पदार्पणातच शतक ठोकण्याची कामगिरी केली. त्याचबरोबर ‘दुलीप’ स्पर्धेत लहान वयात (१७ वर्षे ३२० दिवस) शतक करणारा तो पहिला फलंदाज ठरला. सहा धावांच्या अंतरात कार्तिक (१११) आणि शॉ (१५४) बाद झाले. त्यानंतर दिवसातील अखेरचे ३९ चेंडू शिल्लक असताना बाबा इंदरजित बाद झाला तेव्हा पंचांनी पहिल्या दिवसाचा खेळ थांबवला. 

संक्षिप्त धावफलक - इंडिया रेड ८३.३ षटकांत ५ बाद ३१७ (पृथ्वी शॉ १५४, दिनेश कार्तिक १११, भार्गव भट ३-८३)

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news cricket Prithvi Shaw