esakal | वन-डे साठी अश्‍विन, जडेजाला विश्रांती?
sakal

बोलून बातमी शोधा

वन-डे साठी अश्‍विन, जडेजाला विश्रांती?

वन-डे साठी अश्‍विन, जडेजाला विश्रांती?

sakal_logo
By
पीटीआय

कॅंडी -  कसोटी मालिकेत फिरकी गोलंदाजांवर अधिक भार पडल्यामुळे निवड समिती श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी आर. अश्‍विन आणि रवींद्र जडेजा या फिरकी गोलंदाजांना विश्रांती देण्याचा विचार करत आहे. एकदिवसीय मालिकेस २० ऑगस्टपासून सुरवात होत आहे.

दोन प्रमुख फिरकी गोलंदाजांबरोबर मध्यमगती गोलंदाज महंमद शमी यालादेखील विश्रांती देण्याचा विचार सुरू आहे. निवड समितीचे अध्यक्ष एम. एस. के. प्रसाद सध्या श्रीलंकेच्याच दौऱ्यावर आहेत. त्याच वेळी निवड समिती सदस्य देवांग गांधी भारतीय अ संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेले आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी रविवारी (ता. १३) प्रसाद, गांधी आणि अन्य एक सदस्य सरणदीप सिंग यांच्या व्हिडियो कॉन्फरन्स होणार असून, त्याच वेळी संघ निवड केली जाईल. 

युवा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल, डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेल आणि अष्टपैलू कृणाल पंड्या यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. जसप्रीत बुमरा याचा समावेश नक्की आहे. यंदाच्या मोसमात पुन्हा एकदा मायदेशात भारतीय संघ कमालीचा व्यग्र राहणार आहे. त्यामुळेच निवड समिती उपलब्ध पर्यांयांचा विचार करण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

loading image