फलंदाजांच्या शरणागतीमुळे भारतीय संघाचा पराभव

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

गुवाहाटी - ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात आल्यापासून जवळपास प्रत्येक सामन्यात बहरणारी भारतीयांची फलंदाजी आज कोलमडली आणि या सुवर्णसंधीचा फायदा घेत ऑस्ट्रेलियाने दुसरा टी-२० सामना आठ विकेटने जिंकला. याचबरोबर तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.

प्रथम फलंदाजी मिळालेल्या भारताला सहा धावांच्या सरासरीचेही आव्हान उभे करता आले नाही. ११८ धावांत सर्व संघ गारद झाला. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान १५.३ षटकांत पार केले. पहिल्याच चेंडूवर चौकार त्यानंतर आणखी एक चेंडू सीमापार धाडून रोहित शर्माने जोरदार सुरवात केली; परंतु चौथ्याच चेंडूवर तो बाद झाला. दोन चेंडूंनंतर विराटही माघारी फिरला आणि तेथूनच भारतीय संघाच्या फलंदाजीचेही दैवही माघारी फिरले. 

संक्षिप्त धावफलक - भारत २० षटकांत सर्वबाद ११८ (रोहित ८, धवन २, कोहली ०, पांडे ६, केदार २७ -२७ चेंडू, ३ चौकार, १ षटकार, धोनी १३, हार्दिक पंड्या २५ -२३ चेंडू, १ षटकार,  बेहरेंडॉफ ४-२१, झंपा २-१९), पराभूत वि. ऑस्ट्रेलिया ः १५.३ षटकांत २ बाद १२२ (हेन्रिकेस नाबाद ६२ -४६ चेंडू, ४ चौकार, ४ षटकार, ट्रॅव्हिस हेड नाबाद ४८ -३४ चेंडू, ५ चौकार, १ षटकार, भुवनेश्‍वर १-९)

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news cricket t-20 match