झिंबाब्वे पहिल्या कसोटी विजयाच्या उंबरठ्यावर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

श्रीलंकेसमोर अजून २१८ धावांचे आव्हान
कोलंबो - श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकल्यावर आता झिंबाब्वे त्यांच्याविरुद्धच पहिल्या कसोटी विजयाचे स्वप्न पाहू लागली आहे. विजयाच्या ते उंबरठ्यावर असून, यजमान श्रीलंकेला ही मानहानी टाळण्यासाठी अजून २१८ धावांची गरज असून, त्यांचे सात गडी बाद व्हायचे आहेत. 

श्रीलंकेसमोर अजून २१८ धावांचे आव्हान
कोलंबो - श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकल्यावर आता झिंबाब्वे त्यांच्याविरुद्धच पहिल्या कसोटी विजयाचे स्वप्न पाहू लागली आहे. विजयाच्या ते उंबरठ्यावर असून, यजमान श्रीलंकेला ही मानहानी टाळण्यासाठी अजून २१८ धावांची गरज असून, त्यांचे सात गडी बाद व्हायचे आहेत. 

सिकंदर रझाची शतकी खेळीला मिळालेली माल्कम वॉलरची तुल्यबळ साथ आणि त्यानंतर कर्णधार ग्रॅमी क्रीमरच्या अष्टपैलू कामगिरीने झिंबाब्वेने चौथ्या दिवसअखेरीस कसोटी सामन्यावरील आपली पकड मजबूत केली आहे. विजयासाठी ३८८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चौथ्या दिवसअखेरीस श्रीलंकेची अवस्था ३ बाद १७० अशी बिकट झाली आहे. कुशल मेंडिस (६०) तग धरून असून, साथीला माजी कर्णधार एंजेलो मॅथ्यूज (१७) नाबाद असून, आता याच जोडीवर श्रीलंकेच्या आशा अवलंबून आहेत. झिंबाब्वेचा कर्णधार क्रीमरने फलंदाजीत चमक दाखवल्यानंतर गोलंदाजीतही त्याने दोन गडी बाद करून श्रीलंकेला अडचणीत आणले. 

त्यापूर्वी, सकाळी रझाने ७६व्या षटकांत लकमलच्या गोलंदाजीवर चौकार वसूल करत आपले पहिले शतक साजरे केले. सातव्या विकेटसाठी रझा-वॉलर या जोडीने १४४ धावा जोडल्या. ही जोडी झटपट बाद झाल्यानंतर क्रीमर आणि डोनाल्ड तिरीपानो यांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांची परीक्षा बघितली. 

संक्षिप्त धावफलक - झिंबाब्वे ३५६ आणि ३७७ (सिकंदर रझा १२७, माल्कम वॉलर ६८, ग्रॅमी क्रिमर ४८, रंगना हेराथ ६-१३३, दिलरुवान परेरा ३-९५) वि. श्रीलंका ३४६ आणि ३ बाद १७० (कुशल मेंडीस खेळत आहे ६०, एंजेलो मॅथ्यूज खेळत आहे १७, दिमुथ करुणारत्ने ४९, ग्रॅमी क्रीमर २-६७)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news cricket test match sri lanka with zimbabve