अव्वल स्थानी थ्री इंडियन्स

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 21 February 2018

दुबई - आयसीसीच्या एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत अव्वल स्थानावर भारताचे वर्चस्व राहिले आहे. कर्णधार विराट कोहलीने फलंदाजीत, जसप्रीत बुमराने गोलंदाजीत, तर टीम इंडियाने सांघिक क्रमवारीत अव्वल स्थान भूषविले आहे. भारतीय संघ यापूर्वीच कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थानावर आहे. 

सहा एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत कोहलीने १८६च्या सरारीने ५५८ धावा केल्या. त्याचा स्ट्राईक रेट ९९.४६ इतका होता. यात तीन शतकांसह एका अर्धशतकाचा समावेश होता. 

गोलंदाजीत जसप्रीत बुमराने मोठी मजल मारली आहे. एकदिवसीय मालिकेत आठ गडी बाद करून त्याने दोन क्रमांकाची झेप घेत अव्वल स्थान पटकावले. गोलंदाजी क्रमवारीत त्याचे अफगाणिस्तानच्या रशिद खानसह ७८७ मानांकन गुण झाले आहेत. गोलंदाजी क्रमवारीत सर्वाधिक फायदा युजवेंद्र चहलला झाला असून, आठ क्रमांकाची झेप घेत अव्वल दहांत आला आहे. दुसरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव १५व्या स्थानावर आला. दक्षिण आफ्रिकेत एकदिवसीय मालिका ५-१ अशी जिंकून भारताने निर्विवाद वर्चस्वासह क्रमवारीत अव्वल स्थान मिळविले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news cricket top position three indian