कर्णधार कोहलीला ‘क्‍लीन चिट’

पीटीआय
सोमवार, 3 जुलै 2017

नवी दिल्ली - चॅंपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेदरम्यान प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि कर्णधार विराट कोहली यांच्यादरम्यान काहीच घडले नसल्याचा निर्वाळा चॅंपियन्स करंडक स्पर्धेसाठी नियुक्त केलेल्या भारतीय संघाचे व्यवस्थापक कपिल मल्होत्रा यांनी केला आहे. कोहलीकडूनही कुठलेही गैरवर्तन घडले नसल्याचा उल्लेख त्यांनी आपल्या अहवालात केला आहे. 

या स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून सुरू असलेल्या कुंबळे-कोहली वादाबाबत व्यवस्थापक मल्होत्रा यांचा अहवाल महत्त्वाचा होता. त्यांनी आपला अहवाल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला सादर केला असून, त्यात कोहलीला ‘क्‍लीन चिट’च दिली आहे. विशेष म्हणजे या वादात कुठल्याही वादग्रस्त घटनेचा उल्लेख नाही, असे क्रिकेट नियामक मंडळाच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले. कुंबळे-कोहली यांच्यातील वादाचे चित्र उभे राहिले असले, तरी मल्होत्रा यांच्या अहवालात कोहलीने प्रशिक्षक कुंबळे यांच्याशी गैरवर्तन केल्याचा किंवा आचारसंहितेचा भंग केला असल्याचा साधा उल्लेखही नाही. तसेच या दोघांमधील वादामुळे ड्रेसिंगरुममधील वातावरण बिघडले असल्याचाही उल्लेख नाही. 

दरम्यान, बीसीसीआयने भारतात झालेल्या तेरा कसोटी सामन्यांसाठी नियुक्त केलेले व्यवस्थापक अनिल पटेल यांना देखील आपला अहवाल देण्यास सांगितले आहे. मल्होत्रा सध्या संघाबरोबर विंडीज दौऱ्यावर असून, एखाद्या राज्याच्या पदाधिकाऱ्याची व्यवस्थापक म्हणून निवड होण्याची ही अखेरची  संधी होती. या पुढे बीसीसीआय पूर्णवेळ व्यवस्थापकाची नियुक्ती करण्याची शक्‍यता आहे.

Web Title: sports news cricket virat kohli