वाऽऽवसीम! आता त्रिशतकाकडे!!

नरेंद्र चोरे
Friday, 16 March 2018

नागपूर - फलंदाजांसाठी नंदनवन ठरलेल्या खेळपट्टीवर वसीम जाफरचे नाबाद द्विशतक व ‘बर्थडे बॉय’ गणेश सतीशने झळकाविलेल्या शतकाच्या जोरावर रणजी विजेत्या विदर्भाने शेष भारताविरुद्ध पहिल्या डावात ३ बाद ५९८ धावांचा विशाल डोंगर रचून सामन्यावरील पकड मजबूत केली. २ बाद २८९ या धावसंख्येवरून डावाला सुरवात करणाऱ्या नाबाद शतकवीर जाफर व सतीशने सहा तास १२ मिनिटे चिवट फलंदाजी करीत शेष भारताच्या प्रभावहीन गोलंदाजीची अक्षरश- पिसे काढली. 

नऊ तासांच्या खेळीदरम्यान जाफरने अनेक वैयक्‍तिक विक्रमांची नोंद केली. त्याने इराणी करंडकात पहिल्या द्विशतकासोबतच प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा, विदर्भाकडून सर्वोच्च वैयक्‍तिक धावा आणि विदर्भाकडून तिसऱ्या गड्यासाठी विक्रमी भागीदारी नोंदविली. यापूर्वी इराणी करंडकात रेल्वेविरुद्ध ११६ धावांची सर्वोच्च वैयक्‍तिक खेळी करणाऱ्या जाफरने ३४ चौकार व एका षटकारांसह ४२५ चेंडूंत नाबाद २८५ धावा करताना विदर्भाकडून सर्वोच्च धावा काढणाऱ्या समीर गुजरला (२२१ धावा) आणि इराणी करंडकात मुरली विजयलाही मागे टाकले. विजयने २११२-१३ मध्ये राजस्थानविरुद्ध २६६ धावा काढल्या होत्या.

सतीशने ३० वा वाढदिवस साजरा करताना फिरकीपटू जयंत यादवला मिडऑनमधून चौकार फटकावून विदर्भाकडून प्रथमश्रेणी क्रिकेटमधील सहावे शतक पूर्ण केले. 

धावफलक - विदर्भ ः पहिला डाव - (२ बाद २८९ वरून) वसीम जाफर खेळत आहे २८५, गणेश सतीश झे. के. एस. भरत गो. कौल १२०, अपूर्व वानखेडे खेळत आहे ४४, अवांतर ७, एकूण १८० षटकांत ३ बाद ५९८.

बाद क्रम - १-१०१, २-२१८, ३-५०७.

गोलंदाजी - सैनी २८-६-९३-०, कौल ३०-५-८०-१, अश्‍विन ४३-२-१२२-१, नदीम ३७-४-१३८-०, जयंत यादव ३८-३-१४९-१, समर्थ ४-०-९-०

जाफरने गाठला १८ हजारचा टप्पा
 वसीम जाफरचा प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये १८ हजार धावांचा टप्पा
 या सामन्यापूर्वी यासाठी १७६ धावांची गरज होती
 हा टप्पा गाठलेला सहावा भारतीय

 सुनील गावस्कर (२५,८३४), सचिन तेंडुलकर (२५,०३६), राहुल द्रविड (२३,७९४), व्हीव्हीएस लक्ष्मण (१९,७३०), विजय हजारे (१८,७४०) यांच्या पंक्तीत विराजमन

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news cricket Wasim Jafar