कार्तिकचा विजयी षटकार

वृत्तसंस्था
Monday, 19 March 2018

कोलंबो - दिनेश कार्तिकने अखेरच्या चेंडूवर षटकार खेचत भारतास निदहास तिरंगी ट्‌वेंटी २० स्पर्धेत विजेतेपद जिंकून दिले. खरे तर रोहित शर्माच्या अर्धशतकानंतरही भारतासमोरील आव्हान अवघड झाले होते. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने ८ बाद १६६ धावा केल्या. त्यानंतर आव्हानाचा पाठलाग करताना चांगली सुरवात होऊनही भारताला विजयासाठी अखेरच्या चेंडूची वाट पाहावी लागली. भारताने ६ बाद १६८ धावा केल्या.

कोलंबो - दिनेश कार्तिकने अखेरच्या चेंडूवर षटकार खेचत भारतास निदहास तिरंगी ट्‌वेंटी २० स्पर्धेत विजेतेपद जिंकून दिले. खरे तर रोहित शर्माच्या अर्धशतकानंतरही भारतासमोरील आव्हान अवघड झाले होते. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने ८ बाद १६६ धावा केल्या. त्यानंतर आव्हानाचा पाठलाग करताना चांगली सुरवात होऊनही भारताला विजयासाठी अखेरच्या चेंडूची वाट पाहावी लागली. भारताने ६ बाद १६८ धावा केल्या.

आव्हानाचा पाठलाग करताना भारताने सामन्याच्या सुरवातीला मिळविलेली पकड मधल्या षटकांत गमावली होती. फलंदाजीत कार्तिकऐवजी विजय शंकरला दिलेली बढती भारतास मारक ठरत होती. अशातच मनीष पांडेही बाद झाला. कार्तिक फलंदाजीस आला, त्या वेळी सामन्यावर बांगलादेशची पकड होती; पण कार्तिकने टी-२० मधील यशस्वी फिनिशर हा लौकिक कायम राखला. आयपीएल तसेच तमिळनाडूच्या अनेक विजयात मोलाची कामगिरी बजावलेल्या कार्तिकने १८ व्या षटकातील ५ बाद १३३ या प्रतिकूल परिस्थितीतही भारतास १६६ धावांचे लक्ष्य पार करण्यास साह्य केले. त्याने भारतास १२ चेंडूंत ३४ धावांची गरज असतानाही अविश्‍वसनीय विजय मिळवून दिला. त्याने १९व्या षटकात दोन चौकार व २ षटकारांसह २२ धावा चोपल्या आणि त्यानंतर अखेरच्या दोन चेंडूंत पाच धावा असताना विजय शंकरने चेंडू हवेत मारल्यावर त्याला क्रॉस करण्यास भाग पाडले. सौम्या सरकारच्या अखेरच्या चेंडूवर त्याने षटकार ठोकून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्या वेळी श्‍वास रोखून बसलेल्या भारतीय चाहत्यांचा जीव भांड्यात पडला. 

प्रेमदासा स्टेडियमवरील या सामन्यात भारताने आव्हान अवघड करूनच घेतले होते. पॉवरप्लेमध्ये फिरकीच्या यशामुळे त्यांची षटके संपवली गेली. शब्बीर रेहमानने याचा फायदा घेत सहकाऱ्यांच्या साथीत अखेरच्या ८ षटकांत ८४ धावांचा चोप दिला होता; मात्र शब्बीरच्या या खेळीवर दिनेश कार्तिकच्या प्रतिकाराने पाणी फिरवले. 

बांगलादेश  ८ बाद १६६ (शब्बीर रहमान ७७ - ५० चेंडूत ७ चौकार व ४ षटकार, महमुदल्ला २१ - १६ चेंडूत २ चौकार, मेहदी हसन मिराझ १९, जयदेव उनाडकट ४-०-३३-२, युजवेंद्र चाहल ४-०-१८-३) पराभूत वि. भारत ः ६ बाद १६८ (रोहित शर्मा ५६ - ४२ चेंडूत ४ चौकार व ३ षटकार, केएल राहुल २४ - १४ चेंडूंत २ चौकार व १ षटकार, मनीष पांडे २८ - २७ 
चेंडूत ३ चौकार, विजय शंकर १७ - १९ चेंडूंत ३ चौकार, दिनेश 
कार्तिक  नाबाद २९ - ८ चेंडूत २ 
चौकार व ३ षटकार, रुबेल हुसेन ४-०-३५-२, सौम्या सरकार ३-०-३३-१, मुस्तफिर रहमान ४-१-२१-१).


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news Dinesh Karthik t-20 cricket india vs Bangladesh