‘कुठलाही प्रसंग कार्तिक निभावून नेतो’

वृत्तसंस्था
Tuesday, 20 March 2018

कोलंबो - दिनेश कार्तिकला वरच्या क्रमांकावर कधीच फलंदाजी करण्याची संधी मिळत नाही, याची खंत त्यालाही वाटते. यानंतरही मैदानावर कितीही कठीण प्रसंग असो, कार्तिक तो निभावून नेतो, असे मत भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने व्यक्त केले आहे. 

कोलंबो - दिनेश कार्तिकला वरच्या क्रमांकावर कधीच फलंदाजी करण्याची संधी मिळत नाही, याची खंत त्यालाही वाटते. यानंतरही मैदानावर कितीही कठीण प्रसंग असो, कार्तिक तो निभावून नेतो, असे मत भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने व्यक्त केले आहे. 

तो म्हणाला,‘‘कार्तिक अनुभवी आहे. त्याच्याकडे चौफेर फटके मारण्याची क्षमता आहे. तो परिस्थितीनुसार खेळ बदलू शकतो. त्याच्याकडून हीच अपेक्षा असते, म्हणूनच त्याला खालच्या क्रमांकावर पाठवले. या सामन्यातही सहावा  क्रमांक मिळाल्यामुळे तो निराश होता. त्या वेळी मीच त्याला तुझ्याकडून सामना संपवण्याची अपेक्षा असल्याचे म्हणालो. त्याच्या ‘मॅच फिनिशिंग’वर आमचा विश्‍वास आहे. त्याच्याकडे ते कौशल्य आहे. अखेरच्या तीन षटकांत त्याच्यासारखा फलंदाज खेळपट्टीवर असणे आवश्‍यक आहे. म्हणूनच त्याला सहाव्या क्रमांकावर पाठवले नाही. त्याने आपले काम चोख बजावले.’’

कार्तिकवर विश्‍वास दाखवला मात्र आपण त्याचा विजयी षटकार पाहू शकलो नाही, असे रोहितने सांगितले. तो म्हणाला,‘‘ एका चेंडूत ५ धावांची गरज असताना मला फार तर चौकार मिळेल, असे वाटले. त्यामुळे सामना ‘टाय’ होईल, असा विचार करून सुपर ओव्हरसाठी पॅड बांधायला मी ड्रेसिंगरूममध्ये गेलो होतो.’’

एकूण सामन्याविषयी रोहितची मते
 कार्तिकची खेळी जबरदस्त होती. धोनीनंतर संघातील कायमस्वरूपी यष्टिरक्षक फलंदाज म्हणून आता निवड समितीने त्याच्यावर विश्‍वास दाखवायला हवा.

 कुठल्याही क्रमांकावर कुठल्याही परिस्थितीत खेळणाऱ्या अशा गुणवान खेळाडूंची संघाला गरज

 वॉशिंग्टन सुंदरची गोलंदाजी प्रभावी होती. नवा चेंडूही त्याने सुरेख हाताळला. पॉवर-प्लेमधील षटकांत त्याने प्रतिस्पर्ध्यांना खिळवून ठेवले

 नवोदितांची कामगिरी सुरेख. त्यांना मालिकेने आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याचा विश्‍वास.

शॉट्‌सचा सराव केला
अंतिम सामन्यात कार्तिकने खास फटके मारले. अशा फटक्‍यांसाठी खास सराव केल्याचे सांगितले. खेळपट्टीवर आल्या आल्या त्याने पहिल्याच षटकांत २२ धावा कुटल्या. त्यानंतर एक्‍स्ट्रा कव्हरवरून विजयी षटकार ठोकला.  कार्तिक म्हणाला, ‘‘गेले काही महिने सपोर्ट स्टाफचे मला खूप सहकार्य झाले. त्यांच्यामुळेच असे फटके खेळण्याचे धारिष्ट्य झाले.’’

थोडे अासू...थोडे हसू...
रोहित बाद झाल्यावर नवोदित विजय शंकरच्या पवित्र्याने चाहत्यांच्या तोंडचे पाणी पळाले; पण कार्तिकने विजय साकारला. यानंतर ट्‌विटरवर शंकरविषयी टीका आणि कार्तिकचे कौतुक होते.

ट्‌विटस दिनेश कार्तिकसाठी
 परिपूर्ण सांघिक खेळ. दिनेश कार्तिकची अविश्‍वसनीय खेळी. नवा संघ जोर धरतोय.
 कार्तिकची अफलातून फलंदाजी. एका जबरदस्त विजयाचा अनुभव. श्‍वास रोखून धरायला लावणारा सामना.

 दडपणाखाली डी.के.ची अफलातून कामगिरी
 कार्तिकने आपल्या खेळीने तिघांना वाचवले. १) भारतीय     संघ, २) विजय शंकर ३) बांगलादेशीयांचा नागीन डान्स पाहण्यापासून चाहत्यांना.

ट्‌विट्‌स विजय शंकरसाठी
 हा विजय शंकर कुठून आला माहीत नाही; पण मी त्याच्यापेक्षा चांगली फलंदाजी करू शकतो
 शंकरची आंतरराष्ट्रीय पदार्पणाची मालिका अखेरची ठरावी
 विजयचा झेल घेतल्याबद्दल मेहंदी हसन मिराज तुझे अभिनंदन
 विजयला आता कुठलेच क्रिकेट खेळू देऊ नका!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news dinesh kartik cricket india