द. आफ्रिकेचा डु प्लेसिस जागतिक संघाचा कर्णधार

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 August 2017

पाकिस्तानात होणार टी-२० लढत

दुबई - पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परतण्याची खात्री गुरुवारी खुद्द आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने दिली. पाकिस्तानात होणाऱ्या टी- २० लढतीसाठी ‘आयसीसी’ने दक्षिण आफ्रिकेच्या फाफ डु प्लेसिस याची कर्णधार म्हणून निवड केली.

पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या या तीन टी- २० सामन्यांच्या मालिकेसाठी ‘आयसीसी’ने आज संघ जाहीर केला. झिंबाब्वेचा माजी कर्णधार अँडी फ्लॉवर यांची संघाच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. संघात दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, श्रीलंका, वेस्ट इंडीजच्या खेळाडूंचा समावेश आहे. पाकिस्तानशी असलेले संबंध लक्षात घेता एकाही भारतीय खेळाडूला या संघात निवडण्यात आलेले नाही. 

संघ ः फाफ डु प्लेसिस (कर्णधार), हशिम आमला, डेव्हिड मिलर, मॉर्ने मॉर्केल, इम्रान ताहिर (सर्व दक्षिण आफ्रिका), सॅम्युएल बद्री, डॅरेन सॅमी (वेस्ट इंडीज), जॉर्ज बेली, बेन कटिंग, टिम पेनी (सर्व ऑस्ट्रेलिया), पॉल कोलिंगवूड (इंग्लंड), ग्रॅंट एलियट (न्यूझीलंड), तामिम इक्‍बाल (बांगलादेश), थिसरा परेरा (श्रीलंका).

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news du plessis global team captain