ख्वाजाचे शतक; ऑस्ट्रेलियाची दमदार फलंदाजी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 7 January 2018

सिडनी - मधल्या फळीतील फलंदाज उस्मान ख्वाजाने सात वर्षांनी जबरदस्त शतकी खेळी करत ॲशेस मालिकेतील पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात इंग्लंडविरुद्ध ऑस्ट्रेलियाची बाजू भक्कम केली.

तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाने ४ बाद ४७९ अशी दमदार मजल मारली होती. उस्मान ख्वाजाचे (१७१) शतक आणि कर्णधार स्टिव स्मिथ (८३), शॉन मार्श (नाबाद ९८), मिशेल मार्श (नाबाद ६३) यांनी अर्धशतकी खेळी करून ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व राखण्यात मदत केली. ऑस्ट्रेलियाकडे आता १३३ धावांची आघाडी आहे. 

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी रणरणत्या उन्हात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांचा घामटा काढला. दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाकडून आणखी दोन शतकी भागीदारी झाल्या. यात ख्वाजाचा एका भागीदारीत वाटा होता. त्याने शॉन मार्शच्या साथीत १०१ धावांची भागीदारी केली. त्यापूर्वी त्याने कर्णधार स्मिथसोबत १८८ धावा जोडल्या होत्या. आजची दुसरी शतकी भागीदारी शॉन आणि मिशेल मार्श बंधूंत झाली. त्यांनी दिवसअखेरपर्यंत नाबाद १०४ धावा जोडल्या आहेत. इंग्लंडचा फिरकी गोलंदाज मासन क्रेन याने बाद करण्यापूर्वी ख्वाजाने आपल्या ५१५ मिनिटांच्या खेळीत ३८१ चेंडूंचा सामना करताना १८ चौकार आणि एका षटकारासह १७१ धावा केल्या. न्यूझीलंडविरुद्ध केलेली १७४ धावांची सर्वोच्च खेळी त्याला गाठता आली नाही. 

संक्षिप्त धावफलक - इंग्लंड ३४८ वि. ऑस्ट्रेलिया पहिला डाव ४ बाद ४७९ (उस्मान ख्वाजा १७१, शॉन मार्श खेळत आहे ९८, मिशेल मार्श खेळत आहे ६३, स्टिव स्मिथ ८३, डेव्हिड वॉर्नर ५६).

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news englad australia test cricket match