esakal | ॲशेसमध्ये प्रकाशझोतात ‘काँटे की टक्कर’
sakal

बोलून बातमी शोधा

ॲशेसमध्ये प्रकाशझोतात ‘काँटे की टक्कर’

ॲशेसमध्ये प्रकाशझोतात ‘काँटे की टक्कर’

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

ॲडलेड - दुसऱ्या ॲशेस कसोटीच्या पहिल्या दिवशी प्रकाशझोतात चुरशीचा खेळ झाला. इंग्लंडच्या गोलंदाजांना यशासाठी, तर ऑस्ट्रेलियन फलंदाजांना धावांसाठी संघर्ष करावा लागला.

मध्य फळीच्या उपयुक्त योगदानामुळे कांगारूंनी ४ बाद २०९ धावा केल्या. प्रकाशझोतात प्रथमच होत असलेल्या ॲशेस कसोटीला पहिल्या दिवशी ५५ हजार ३१७ प्रेक्षक उपस्थित होते. इंग्लंडने अंतिम टप्प्यात प्रतिस्पर्धी कर्णधार स्टीव स्मिथ याची बहुमोल विकेट टिपली. पदार्पण करणाऱ्या क्रेग ओव्हर्टन याच्या वेगवान चेंडूवर स्मिथची दांडी गुल झाली. स्मिथचा फॉर्म बघता चेंडू त्याच्या बॅट आणि पॅडमधून जाणे आश्‍चर्यकारक ठरले. मायदेशात स्मिथचा त्रिफळा यापूर्वी २०१५ मध्ये न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टने उडविला होता. इंग्लंडचा कर्णधार ज्यो रूट याने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला फलंदाजी दिली. 

इंग्लंडसमोर सुरवातीला डेव्हिड वॉर्नर याचा धोका होता. त्याने घणाघाती सुरवात केली होती, पण वोक्सने त्याला बाद केले.  त्याआधी वोक्सच्या चपळाईमुळेच इंग्लंडला पहिले यश मिळाले होते. त्याने कॅमेरॉन बँक्रॉफ्ट याला धावचीत केले. त्यानंतर ख्वाजाने उल्लेखनीय फलंदाजी करीत अर्धशतक झळकाविले.

शाब्दिक चकमकी
आज स्मिथचे जेम्स अँडरसन तसेच स्टुअर्ट ब्रॉड या वेगवान गोलंदाजांशी खटके उडाले. स्मिथ ‘नॉन-स्ट्रायकर्स एन्ड’ला असताना अँडरसन त्याच्या शेजारी जाऊन उभा राहिला आणि शेरेबाजी केली. पंच आलीम दर यांनी अँडरसनला बाजूला केले. ब्रॉडने षटक संपल्यानंतर पंचांकडून स्वेटर घेताना स्मिथला टोमणे मारले. दोन्ही वेळा स्मिथने अर्थातच परतफेड केली.

धावफलक
ऑस्ट्रेलिया - पहिला डाव - कॅमेरॉन बॅंक्रॉफ्ट धावचीत (ख्रिस वोक्‍स) १०, डेव्हिड वॉर्नर झे. बेअरस्टॉ गो. वोक्‍स ४७-१०२ चेंडू, ५ चौकार, उस्मान ख्वाजा झे. व्हिन्स गो. अँडरसन ५३-११२ चेंडू, ८ चौकार, स्टिव स्मिथ त्रि. गो. ओव्हर्टन ४०-९० चेंडू, ३ चौकार, पीटर हॅंड्‌सकाँब खेळत आहे ३६, शॉन मार्श खेळत आहे २०, अवांतर ३, एकूण ८१ षटकांत ४ बाद २०९.
बाद क्रम - १-३३, २-८६, ३-१३९, ४-१६१.
गोलंदाजी - जेम्स अँडरसन २०-३-४५-१, स्टुअर्ट ब्रॉड १९-७-३९-०, ख्रिस वोक्‍स १५-२-५०-१, क्रेग ओव्हर्टन १७-३-४७-१, मोईन अली १०-१-२५-०.

loading image
go to top