इंग्लंड भक्कम स्थितीत
ख्राइस्टचर्च (न्यूझीलंड) - न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका बरोबरीत सोडविण्याच्या दृष्टीने भक्कम पाऊल टाकताना इंग्लंडने तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आपली आघाडी २३१ धावांपर्यंत वाढवली. तिसऱ्या दिवशी अपुऱ्या प्रकाशामुळे तीन षटके आधी खेळ थांबविण्यात आला.
तिसऱ्या दिवशी खेळ थांबविण्यात आला तेव्हा इंग्लंडने दुसऱ्या डावात ३ बाद २०२ धावा केल्या होत्या. कर्णधार ज्यो रुट ३०, तर डेविड मलान १९ धावांवर खेळत होता. इंग्लंडची सामन्यावर पूर्ण पकड असली, तरी उद्या इंग्लंड आपली आघाडी किती वाढवणार आणि न्यूझीलंडसमोर किती धावांचे आव्हान ठेवणार हा औत्सुक्याचा भाग राहणार आहे.

तिसऱ्या दिवशी जेम्स विन्स आणि मार्क स्टोनमन यांनी इंग्लंडची आघाडी वाढवली. चहापानानंतर न्यूझीलंडला या दोघांना बाद करण्यात यश आले; मात्र हे दोन्ही खेळाडू आपल्या पहिल्या शतकापर्यंत पोचू शकले नाहीत. स्टोनमन ६०, व्हिन्स ७६ धावांवर बाद झाला. सलामीचा फइलंदाज ॲलिस्टर कूकला (१४) या वेळीही सूर गवसला नाही.
त्यापूर्वी कारकिर्दीत सोळाव्यांदा डावात पाच गडी बाद करताना स्टुअर्ट ब्रॉडने न्यूझीलंडच्या डावाला २७८ धावांवर पूर्णविराम दिला. वॉल्टिंगने सर्वाधिक ८५ धावा केल्या. डावाच्या अखेरीस टीम साऊदीने (५०) देखील अर्धशतक झळकावले. नील वॅगनर आणि ट्रेंट बोल्ट यानी काहीशी आक्रमक फलंदाजी केल्याने न्यूझीलंडला पहिल्या डावात पावणे तीनशेची मजल मारणे शक्य झाले.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड ३०७ आणि ३ बाद २०२ (मार्क स्टोनमन ६०, जेम्स व्हिन्स ७६, ज्यो रुट खेळत आहे ३०, टीम साऊदी २-३८) वि. न्यूझीलंड २७८ (बीजे वॉल्टिंग ८५, ग्रॅंडहोम ७२, टीम साऊदी ५०, स्टुअर्ट ब्रॉड ६-५४, जेम्स अँडरसन ४-७६)