इंग्लंडच्या विजयात हवामानाचा अडथळा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 एप्रिल 2018

ख्राईस्टचर्च - दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात यजमान न्यूझीलंडवर विजय मिळविण्याच्या मार्गावर असणाऱ्या इंग्लंडसमोर आता हवामानाचा अडथळा उभा राहिला आहे. 

इंग्लंडच्या उर्वरित फलंदाजांनी चौथ्या दिवशी फारशी समाधानकारक फलंदाजी केली नसली तरी, त्यांना न्यूझीलंडसमोर विजयासाठी ३८२ धावांचे आव्हान ठेवता आले. इंग्लंडने दुसरा डाव ९ बाद ३५२ धावसंख्येवर घोषित केला. आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडने बिनबाद ४२ धावा केल्या तेव्हा अपुऱ्या प्रकाशामुळे खेळ थांबविण्यात आला. त्या वेळी टॉम लॅथम २५ आणि जीत रावळ १७ धावांवर खेळत होता.

संक्षिप्त धावफलक 
इंग्लंड ३०७ आणि ९ बाद ३५२ (घोषित) (मार्क स्टोनमन ६०, जेम्स व्हिन्स ७६, ज्यो रुट ५४, डेविड मालन ५३, ग्रॅंडहोम ४-९४, वॅगनर २-५१, बोल्ट २-८९) वि. न्यूझीलंड २७८ आणि बिनबाद ४२.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news england newzeland test cricket match