इंग्लंड ४ बाद १९६

पीटीआय
Friday, 24 November 2017

ब्रिस्बेन - ॲशस मालिकेला अपेक्षेप्रमाणे जोरदार प्रारंभ झाला असून, इंग्लंडने दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केल्यानंतर ऑस्ट्रेलियाने तीन विकेट टिपत प्रतिआक्रमण रचले. पावसामुळे ९५ मिनिटांचा व्यत्यय आलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी पारडे संतुलित राहिले.

ब्रिस्बेन - ॲशस मालिकेला अपेक्षेप्रमाणे जोरदार प्रारंभ झाला असून, इंग्लंडने दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केल्यानंतर ऑस्ट्रेलियाने तीन विकेट टिपत प्रतिआक्रमण रचले. पावसामुळे ९५ मिनिटांचा व्यत्यय आलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी पारडे संतुलित राहिले.

‘गॅबा’ मैदानावर खेळ संपला तेव्हा इंग्लंडने ४ बाद १९६ अशी मजल मारली होती. पदार्पण करणाऱ्या जेम्स व्हिन्सने मार्क स्टोनमन याच्या साथीत दुसऱ्या विकेटसाठी १२५ धावांची भागीदारी रचली. त्यानंतर कांगारूंनी ३६ धावांत तीन विकेट टिपल्या. यात सर्वाधिक धावा केलेल्या व्हिन्सला नेथन लायनने धावचीत केले. सहा वर्षांत एकूण सहावीच आणि मायदेशात पहिली कसोटी खेळणारा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने स्टोनमनचा त्रिफळा उडविला, तर प्रतिस्पर्धी कर्णधार ज्यो रूट याला पायचीत केले. रूटला पंचांनी नाबाद ठरविले होते, पण ‘रिव्ह्यू’मुळे कांगारूंच्या बाजूने निर्णय लागला. दिवसअखेर डेविड मॅलन (२८) आणि मोईन अली (१३) नाबाद होते.

रूट याने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली. मिचेल स्टार्कने तिसऱ्याच षटकात ॲलिस्टर कूकला केवळ दोन धावांवर बाद केले. कूक पॅव्हेलियनमध्ये परत जात असताना ब्रिस्बेनच्या प्रेक्षकांनी एकच गदारोळ केला. १९८८ पासून कांगारू ‘गॅबा’वर अपराजित आहेत. त्यामुळे हे मैदान प्रतिस्पर्ध्यांसाठी नेहमीच खडतर ठरते. अशा पार्श्‍वभूमीवर स्टोनमन-व्हिन्स यांनी नेटाने प्रतिकार केला. 

धावफलक : इंग्लंड - ८०.३ षटकांत ४ बाद १९६ (मार्क स्टोनमन ५३-१५९ चेंडू, ३ चौकार, जेम्स व्हिन्स ८३-१७० चेंडू, १२ चौकार, ज्यो रूट १५, मिचेल स्टार्क १-४५, पॅट कमिन्स २-५९)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news england vs australia ashes