इंग्लंडचा डाव ५८ धावांत आटोपला

वृत्तसंस्था
Friday, 23 March 2018

ऑकलंड - न्यूझीलंडमधझील पहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात इंग्लंडचा पहिला डाव ५८ धावांत आटोपला. कसोटी इतिहासातील इंग्लंडची ही एक खराब कामगिरी ठरली. वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टचा भेदक मारा आणि त्यानंतर कर्णधारक केन विल्यम्सनची चिवट फलंदाजी याच्या जोरावर न्यूझीलंडने पहिल्या कसोटीत पहिल्या दिवशीच सामन्यावरील आपली पकड मजबूत केली.

पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा इंग्लंडला अवघ्या २०.४ षटकांत रोखल्यावर न्यूझीलंडने ११७ धावांची आघाडी घेताना पहिल्या डावात ३ बाद १७५ धावा केल्या होत्या. केन विल्यम्सन ९१, तर हेन्‍री निकोल्स २४ धावांवर खेळत होता. 

नाणेफेक जिंकून कर्णधार विल्यम्सनने घेतलेला गोलंदाजी करण्याचा निर्णय ट्रेंट बोल्ट आणि टिम साऊदी यांनी खरा ठरवला. पाचव्या षटकांत इंग्लंडची पहिली विकेट पडली आणि त्यानंतर २१व्या षटकातील चौथ्या चेंडूवर त्यांचा डाव ५८ धावांत आटोपला. 

बोल्टकडून एकामागून एक मिळणाऱ्या हादऱ्याने न्यूझीलंड संघ एकवेळ ९ बाद २७ असा अडचणीत आला होता. त्यानंतर क्रेग ओव्हर्टन याने नाबाद ३३ धावांची खेळी केल्याने त्यांना किमान अर्धशतक तरी गाठता आले. 

संक्षिप्त धावफलक  
इंग्लंड २०.४ षटकांत सर्वबाद ५८ (क्रेग ओव्हर्टन नाबाद ३३, बोल्ट ६-३२, साउदी ४-२५) वि. न्यूझीलंड ६९ षटकांत ३ बाद १७५ (विल्यम्सन खेळत आहे ९१, निकोल्स खेळत आहे २४, टॉम लॅथम २६, अँडरसन २-३२)

इंग्लंडची दाणादाण 
इंग्लंडची कसोटी क्रिकेटमधील सहावी नीचांकी धावसंख्या ठरली. 
धावसंख्या     प्रतिस्पर्धी     केंद्र/वर्ष
४५     ऑस्ट्रेलिया     सिडनी, १८८७
४६     वेस्ट इंडीज     पोर्ट ऑफ स्पेन १९९४
५१     वेस्ट इंडीज     किंग्जस्टन, २००९
५२     ऑस्ट्रेलिया     ओव्हल १९४८
५३     ऑस्ट्रेलिया     लॉर्डस १८८८
५८     न्यूझीलंड     ऑकलंड २०१८

     सर्वाधिक नीचांकी (२६) धावसंख्या न्यूझीलंडची. १९५५ मध्ये याच मैदानावर इंग्लंडविरुद्धच
     इंग्लंडकडून नवव्या क्रमांकावरील क्रेग ओव्हर्टनच्या सर्वाधिक धावा
     ओव्हर्टनखेरीज केवळ मार्क स्टोनमन (११) यालाच दोन आकडी धावा करता आल्या
     इंग्लंडच्या डावात ५ फलंदाजांचा भोपळा

असा संपला डाव ः
१-६(कूक, ४.२ षटके), २-६(रुट, ६.२), ३-१६ (मालन, ८.१), ४-१८ (स्टोनमन ९.४), ५-१८ (स्टोक्‍स, १०.३), ६-१८ (बेअरस्टॉ, ११.२), ७-२३ (वोक्‍स, १२.६), ८-२३(मोईन, १३.४), ९-२७ (ब्रॉड, १५.४), सर्वबाद ५८ (अँडरसन, २०.४)

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news england vs new zealand cricket