इंग्लंडचा विंडीजवर दणदणीत विजय

सकाळ वृत्तसेवा
Monday, 21 August 2017

बर्मिंगहॅम - इंग्लंडने पहिल्या वहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात वेस्ट इंडीजवर तिसऱ्याच दिवशी १ डाव आणि २०९ धावांनी विजय मिळविला. 
पहिल्या डावात फॉलोऑनची नामुष्की आल्यानंतरही दुसऱ्या डावातही विंडीजची घसरगुंडीच उडाली. त्यांचा दुसरा डाव १३७ धावांत संपुष्टात आला. तिसऱ्या दिवशी त्यांनी १९ गडी गमावले. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने १-० अशी आघाडी घेतली.  

पहिल्या डावात ३४६ धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर इंग्लंडने त्यांच्यावर फॉलोऑन लादला होता; पण इंग्लंडच्या भेदक माऱ्यासमोर त्यांचा डाव गडगडला. स्टुअर्ट ब्रॉडने ११ चेडूंत ४ धावांत ३ फलंदाज बाद करत त्यांना सुरवातीलाच दणका दिला. या कामगिरीने त्याने इयान बोथमला (३८३) मागे टाकले. त्यानंतर अँडरसन, रोलॅंड-जोन्स, मोईन अली यांनी विंडीजच्या डावाला पूर्णविराम देण्याची कामगिरी पार पाडली. 

संक्षिप्त धावफलक
इंग्लंड ८ बाद ५१४ घोषित वि.वि. वेस्ट इंडीज १६८ आणि १३७ (कार्लोस ब्रेथवेड ४०, रोस्टन चेस २४, स्टुअर्ट ब्रॉड ३-३४, जेम्स अँडरसन २-१२, रोलॅंड-जोन्स २-१८, मोईन अली २-५४).

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news england west indies test cricket match