एकदिवसीय मालिकेत इंग्लंडचे वर्चस्व

सकाळ वृत्तसेवा
Monday, 29 January 2018

पर्थ - वेगवान गोलंदाज टॉम क्‍युरनच्या भेदक माऱ्यापुढे निष्प्रभ ठरलेल्या ऑस्ट्रेलियाला इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या एकदिवसीय सामन्यातही पराभव पत्करावा लागला. इंग्लंडने अखेरचा सामना १२ धावांनी जिंकून पाच सामन्यांच्या मालिकेत ४-१ असे विजेतेपद मिळविले. 

ज्यो रुटच्या ६२ धावांच्या जोरावर इंग्लंडने २५९ धावांची मजल मारली. ऑस्ट्रेलियाचा डाव ४८.२ षटकांत २४७ धावांत संपुष्टात आला. पर्थच्या नव्या कोऱ्या स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाला पराभवाचे धनी व्हावे लागले. 

संक्षिप्त धावफलक - इंग्लंड ४७.४ षटकांत सर्वबाद २५९ (ज्यो रुट ६२, जेसन रॉय ४९, जॉनी बेअरस्टॉ ४४, ॲण्ड्रयू टाय ५-४६, मिशेल मार्श २-२४) वि.वि. ऑस्ट्रेलिया ४८.२ षटकांत सर्वबाद २४७ (मार्क्‍स स्टोईनीस ८७, ग्लेन मॅक्‍सवेल ३४, टीम पेनी ३४, टॉम क्‍युरन ५-३५, मोईन अली ३-५५).

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news england win in one day cricket competition