‘दादा फुटबॉलपटू’ची दमछाक झाल्याने ‘दादा’चा हिरमोड

बुधवार, 13 डिसेंबर 2017

बारासात - अर्जेंटिनाचा जगप्रसिद्ध फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना दौरा अनेक वेळा लांबणीवर टाकल्यानंतर अखेर कोलकात्यामध्ये दाखल झाला, पण मंगळवारी उष्ण हवामानात दमछाक झाल्यामुळे तो माजी क्रिकेट कर्णधार सौरभ गांगुली याच्या संघाविरुद्ध प्रदर्शनी फुटबॉल सामना खेळू शकला नाही. त्यामुळे गांगुलीचा हिरमोड झाला. ‘सेव्हन-ए-साइड’ फुटबॉलची ही लढत होती. याचे नामकरण ‘दिएगो विरुद्ध दादा’ असे करण्यात आले होते. ढिसाळ संयोजनही यास कारणीभूत ठरले. मॅराडोनाला ३५ किलोमीटरचा प्रवास मोटारीतून करावा लागला. मार्गात अनेक खड्डे होते. कदंबगाछी येथे तो पोचला तेव्हाच तो दमला होता.

बारासात - अर्जेंटिनाचा जगप्रसिद्ध फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना दौरा अनेक वेळा लांबणीवर टाकल्यानंतर अखेर कोलकात्यामध्ये दाखल झाला, पण मंगळवारी उष्ण हवामानात दमछाक झाल्यामुळे तो माजी क्रिकेट कर्णधार सौरभ गांगुली याच्या संघाविरुद्ध प्रदर्शनी फुटबॉल सामना खेळू शकला नाही. त्यामुळे गांगुलीचा हिरमोड झाला.

‘सेव्हन-ए-साइड’ फुटबॉलची ही लढत होती. याचे नामकरण ‘दिएगो विरुद्ध दादा’ असे करण्यात आले होते. ढिसाळ संयोजनही यास कारणीभूत ठरले. मॅराडोनाला ३५ किलोमीटरचा प्रवास मोटारीतून करावा लागला. मार्गात अनेक खड्डे होते. कदंबगाछी येथे तो पोचला तेव्हाच तो दमला होता.

संयोजकांना स्टेज उभारले नव्हते. त्यामुळे मॅराडोना उन्हात घामाघूम झाला. तो ‘डग-आउट’मध्ये सारखा जात होता. त्यामुळे मॅराडोनाने उपस्थितांशी फक्त हस्तांदोलन केले. जमलेल्या प्रेक्षकांना त्याने अभिवादन केले. त्याने काही ‘किक’ मारल्या आणि लढतीला औपचारिक सुरवात करून दिली. त्यानंतर तो मैदानाबाहेर गेला. त्यावेळी प्रेक्षक ‘दिएगो-दिएगो’ असा जयघोष करीत होते.

गांगुलीने १९८६ मधील मॅराडोनाच्या जगज्जेतेपदाचा पराक्रम टीव्हीवर पाहिला होता. मॅराडोना त्याचा आवडता फुटबॉलपटू आहे. तो म्हणाला की, मॅराडोनाबरोबर खेळलो असतो तर फार भारी वाटले असते, पण तो खेळू शकला नाही. त्याचे वय झाले आहे, पण तो अत्यंत दर्जेदार फुटबॉलपटू आहे. त्याला इतक्‍या जवळून पाहता आले ही पर्वणीच ठरली.’

मॅराडोनाची ही दुसरी कोलकाता भेट आहे. यापूर्वी तो २००८ मध्ये आला होता. त्यावेळी त्याला हेलिकॉप्टरमधून महेस्थला या ठिकाणी नेण्यात आले होते.
यावेळी तीन दिवसांच्या दौऱ्याची लढत मुख्य आकर्षण होते. यात गांगुली दोन्ही संघांकडून खेळला. आधी त्याने पांढरी जर्सी घातली. मग निळी जर्सी घालून तो दुसऱ्या संघाकडून खेळला.