आता कसोटी कशी?

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 5 December 2017

नवी दिल्ली - राजधानीतील प्रदूषण गंभीर असताना भारत-श्रीलंका यांच्यातील कसोटीचे आयोजन कसे केले, अशी विचारणा राष्ट्रीय हरित लवादाने दिल्ली सरकारकडे केली आहे. त्याचबरोबर प्रदूषण कमी करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती ४८ तासांत सादर करण्यास सांगितले आहे.

भारत-श्रीलंका यांच्यातील दिल्ली कसोटीच्या वेळी प्रदूषणाचा स्तर खूपच जास्त असल्याचे आकडे समोर येत आहेत. श्रीलंका खेळाडूंनी प्रदूषणाचा त्रास टाळण्यासाठी दुसऱ्या दिवशी मास्क परिधान केले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा प्रदूषणाबाबत काहीही नियम नाही, त्यामुळे याबाबतचे अधिकार सामनाधिकाऱ्यांकडेच आहेत. 

बीसीसीआयलाच हा विसर
प्रदूषणामुळे गेल्याच महिन्यातील बंगाल-गुजरात लढत रद्द करण्यात आली होती, तर कर्नेलसिंग स्टेडियमवरील हैदराबाद-त्रिपुरा लढतही अन्यत्र हलवण्यात आली होती. त्या वेळी भारतीय क्रिकेट मंडळाने दिल्लीतील प्रदूषण गंभीर असल्याचे सांगितले होते. 

वर्ल्ड कपचा कार्यक्रमही...
भारतातील विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेचा कार्यक्रम तयार करताना दिल्लीतील प्रदूषण लक्षात घेतले होते. दिल्लीत दिवाळीपासून फेब्रुवारीपर्यंत वातावरण खूपच प्रतिकूल आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news How to test match now?