सलामीलाच फलंदाजांची हाराकिरी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 डिसेंबर 2017

धरमशाला - भारतीय फलंदाजांचे सदोष तंत्र आणि वेगवान गोलंदाजीसाठी पोषक असणाऱ्या वातावरणाचा अचूक फायदा उठवत श्रीलंकेने गेल्या १२ एकदिवसीय सामन्यातील पराभवाची मालिका खंडित केली. कसोटी मालिकेनंतर शुक्रवारी झालेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात त्यांनी भारताचा सात गडी राखून सहज पराभव केला. 

धरमशाला - भारतीय फलंदाजांचे सदोष तंत्र आणि वेगवान गोलंदाजीसाठी पोषक असणाऱ्या वातावरणाचा अचूक फायदा उठवत श्रीलंकेने गेल्या १२ एकदिवसीय सामन्यातील पराभवाची मालिका खंडित केली. कसोटी मालिकेनंतर शुक्रवारी झालेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात त्यांनी भारताचा सात गडी राखून सहज पराभव केला. 

श्रीलंकेने आपली पराभवाची मालिका नुसतीच खंडित केली नाही, तर या मोसमात भारताविरुद्ध पहिला विजय नोंदवला. फलंदाजांची हाराकिरी हेच भारताच्या पराभवाचे मुख्य कारण म्हणता येईल. नाणफेक जिंकून श्रीलंकेच्या गोलंदाजांनी पोषाक वातावरणाचा सुरेख फायदा उठवून यजमानांच्या दर्जेदार फलंदाजीचे तंत्रच जणू उघडे पाडले.

रोहित शर्माच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीची सुरवातही अपयशी ठरली. ३८.२ षटकांत भारताचा डाव ११२ धावांत आटोपला. पहिल्या कसोटीत भारताला दणके देणाऱ्या लकमलने १३ धावांत ४ गडी बाद केले. त्यानंतर श्रीलंकेने २०.४ षटकांतच ३ बाद ११४ धावा करून विजयाला गवसणी घातली.
भारताचा निम्मा डाव १६ धावांत संपुष्टात आला होता. अर्धशतकाच्या आतच भारताचा डाव आटोपणार अशीच (७ बाद २८) एकवेळ परिस्थिती होती. अशा वेळी माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने एकाबाजूने जिगरबाज खेळी करून भारतीय डावाची लाज राखल्यामुळेच त्यांना किमान शंभरी गाठता आली. भारताच्या डावातील निम्म्याहून अधिक धावा धोनीच्या एकट्याच्या होत्या. त्याने ८७ चेंडूंत ६५ धावांची खेळी केली. 

आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेनेदेखील तीन गडी झटपट गमावले. मात्र, उपुल थरंगाच्या ४६ चेंडूंतील १० चौकारांसह सजलेल्या ४९ धावांच्या खेळीने त्यांचा विजय सुकर झाला. एंजेलो मॅथ्यूज आणि निरोशान डिकवेला यांनी नंतर २९.२ षटके शिल्लक ठेवून विजय मिळविला. 

कोहलीच्या गैरहजेरीत भारताचे फलंदाज कागदावरीलच घोडे ठरले. धवन, रोहित, श्रेयस, कार्तिक यांना चेंडूंची दिशाच समजली नाही. अन्य फलंदाज नवखे होते; पण यानंतरही वेगवान गोलंदाजीला साथ देणाऱ्या खेळपट्टी म्हणा किंवा हवामानात भारतीय फलंदाजीच्या उणिवा प्रकर्षाने समोर आल्या.

धावफलक
भारत - 

रोहित शर्मा झे. डिकवेला गो. लकमल २, शिखर धवन पायचित गो. मॅथ्यूज ०, श्रेयस अय्यर त्रि. गो. प्रदीप ९, दिनेश कार्तिक पायचित गो. लकमल ०, मनीष पांडे झे. मॅथ्यूज गो. लकमल २, महेंद्रसिंह धोनी झे. गुणतालिका गो. परेरा ६५, हार्दिक पंड्या झे. मॅथ्यूज गो. प्रदीप १०, भुवनेश्‍वर कुमार झे. डिकवेला गो. लकमल ०, कुलदीप यादव यष्टि. डिकवेला गो. धनंजय १९, जसप्रित बुमरा त्रि. पथिराणा ०, युजवेंद्र चहल नाबाद ०, अवांतर ५, एकूण ३८.२ षटकांत सर्वबाद ११२

गडी बाद क्रम - १-०, २-२, ३-८, ४-६, ५-६, ६-२८, ७-२७, ८-७०, ९-८७
गोलंदाजी - सुरंगा लकमल १०-४-१३-४, एंजेलो मॅथ्यूज ५-२-८-१, नुआन प्रदीप १०-४-३७-२, थिसरा परेरा ४.२-०-२९-१, अकिला धनंजय ५-२-७-१, सचिथ पथिराणा ४-१-१६-१

श्रीलंका - 
दनुष्का गुणतिलका झे. धोनी गो. बुमरा १, उपुल थरंगा झेय धवन गो. पांड्या ४९, लाहिरु थिरीमन्ने त्रि. गो. बुमरा ०, एंजेलो मॅथ्यूज नाबाद २५, निरोशान डिकवेला नाबाद २६, अवांतर १३, एकूण २०.४ षटकांत ३ बाद ११३ 
गडी बाद क्रम - १-७, २-१९, ३-६५
गोलंदाजी - भुवनेश्‍वर कुमार ८.४-१-४२-१, जसप्रित बुमरा ७-१-३२-१, हार्दिक पंड्या ५-०-३९-१

पहिला सामना विशेष
     भारताची एकदिवसीय क्रिकेटमधील मायदेशातील प्रथम फलंदाजी करताना तिसरी नीचांकी धावसंख्या.
     भारताची एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वकालिक नीचांकी धावसंख्या श्रीलंकेविरुद्धच १९८६ मध्ये कानपूर येथे सर्वबाद ८६
     भारताच्या डावात एकदिवसीय क्रिकेटमध्ये तेरा षटके निर्धाव. गेल्या दहा वर्षांतील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ही सर्वाधिक निर्धाव षटके. यापूर्वी भारताच्याच डावात इंग्लंडविरुद्ध १९७५च्या विश्‍वकरंडक सामन्यात १२ आणि न्यूझीलंडविरुद्ध १९८१ मध्ये १२ षटके निर्धाव
     भारताच्या धावसंख्येत धोनीचा (६५) वाटा ५८.०३ टक्के. वैयक्तिक खेळीतील ही चौथी मोठी टक्केवारी
     भारताच्या मायदेशातील नीचांकी धावा ७८ (विरुद्ध श्रीलंका १९८६), १०० (वि. वेस्ट इंडीज १९९३), ११२ (वि. श्रीलंका २०१७), १३५ (वि. वेस्ट इंडीज, १९८७), १३५ (वि. पाकिस्तान, १९९९).
     भारताचा निम्मा संघ १६ धावांत गारद. भारताची एकदिवसीय क्रिकेटमधील ही नीचांकी कामगिरी. यापूर्वी १९८३ विश्‍वकरंडक स्पर्धेत झिंबाब्वेविरुद्ध ५ बाद १७
     भारताचे पहिले पाच फलंदाज दोन आकडी धावाही करू न शकण्याची पाचवी वेळ
     दिनेश कार्तिक १८ चेंडू खेळल्यानंतरही शून्यावर बाद. यापूर्वी १९७५ मध्ये इंग्लंडविरुद्ध एकनाथ सोलकर १७ चेंडूंत खाते उघडू शकला नव्हता.
     भारताचे चार फलंदाज शून्यावर बाद. एकदिवसीय क्रिकेटमधील या खराब कामगिरीची बरोबरी. यापूर्वी २०११ विश्‍वकरंडक स्पर्धेत अशी वेळ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध. 
     २०१३ पासून ६३ सामन्यांत एकदिवसीय क्रिकेटमध्ये शिखर धवन प्रथमच शून्यावर बाद.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news india defeated by srilanka in one day cricket match