esakal | निर्णायक सामना जाणार पावसात वाहून?
sakal

बोलून बातमी शोधा

तिरुअनंतपुरम - भारत आणि न्यूझीलंडदरम्यान उद्या मंगळवारी टी २० सामना होणार असला, तरी सामन्यावर पावसाचे सावट आहे. सामन्याच्या आदल्या दिवशीही पावसामुळे मैदान असे आच्छादलेले होते.

निर्णायक सामना जाणार पावसात वाहून?

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

भारत-न्यूझीलंड दरम्यान अखेरचा टी २० सामना आज
तिरुअनंतपुरम - गेल्या महिन्यात झालेल्या भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेप्रमाणे न्यूझीलंडविरुद्धची टी-२० मालिकाही पावसामुळे बरोबरीत सुटण्याची शक्‍यता आहे. केरळच्या राजधानीत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे आणि उद्याही अशाच पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे.

आपल्या ट्‌वेन्टी-२० क्रिकेटच्या इतिहासात भारताने न्यूझीलंडविरुद्ध पहिलावहिला विजय मिळवला खरा; परंतु दुसऱ्या सामन्यात मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. मालिकेचा निर्णय होणारा तिसरा सामना उद्या होत आहे, परंतु त्याचे संपूर्ण भवितव्य पावसावर अवलंबून आहे. पावसामुळे खेळ किती शक्‍य आहे हे उद्याच्या परिस्थितीवर निश्‍चित होईल. एकंदरीत परिस्थिती पाहता खेळ झालाच तर तो पूर्ण २० षटकांचा होणे कठीण आहे.

सराव रद्द
दोन्ही संघ रविवारी रात्री येथे दाखल झाले; परंतु आज पडलेल्या तुफानी पावसामुळे सराव रद्द करावा लागला. रवी शास्त्री आणि त्यांचे सहायक संजय बांगर यांनी पद्मनाभ स्वामी मंदिराचे दर्शन घेतले; तर ‘से यस टू क्रिकेट आणि नो टू ड्रग्स’ या केरळ सरकारच्या उपक्रमासाठी विराट कोहली आणि इतर दोन संघ सहकाऱ्यांनी चंद्रशेखर नायर स्टेडियममध्ये उपस्थिती लावली.

loading image