धोनी, भुवनेश्‍वरने साकारला विजय

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 August 2017

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताची श्रीलंकेवर संघर्षपूर्ण मात

कॅंडी - महेंद्रसिंह धोनीचा अनुभव आणि त्याला भुवनेश्‍वर कुमारने दिलेल्या साथीमुळे भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा विजयाचा घास त्यांच्या तोंडातून काढून घेतला. भारताने श्रीलंकेचा ३ गडी राखून पराभव केला. 

श्रीलंकेने ८ बाद २३६ धावा केल्या. भारताचा डाव सुरू होण्यापूर्वी आलेल्या पावसामुळे भारतासमोर ४७ षटकांत २३१ धावांचे सुधारित आव्हान ठेवण्यात आले होते. भारताने ४४. २ षटकांत ७ बाद २३१ धावा केल्या. 

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताची श्रीलंकेवर संघर्षपूर्ण मात

कॅंडी - महेंद्रसिंह धोनीचा अनुभव आणि त्याला भुवनेश्‍वर कुमारने दिलेल्या साथीमुळे भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा विजयाचा घास त्यांच्या तोंडातून काढून घेतला. भारताने श्रीलंकेचा ३ गडी राखून पराभव केला. 

श्रीलंकेने ८ बाद २३६ धावा केल्या. भारताचा डाव सुरू होण्यापूर्वी आलेल्या पावसामुळे भारतासमोर ४७ षटकांत २३१ धावांचे सुधारित आव्हान ठेवण्यात आले होते. भारताने ४४. २ षटकांत ७ बाद २३१ धावा केल्या. 

आव्हानाचा पाठलाग करताना बिनबाद १०९ अशा भक्कम सुरवातीनंतर अकिला धनंजयच्या ‘गुगली’ने भारताची विकेट घेतली होती. भारताचा डाव २२ षटकांत ७ बाद १३१ असा अडचणीत आला होता. धनंजयने भारताचे सहा गडी झटपट बाद केले; पण त्यानंतर धोनीने आपल्या अनुभवाच्या जोरावर अत्यंत संयमी खेळ करत भुवनेश्‍वरला साथीला घेत भारताचा डाव सावरला.

धोनी संयम राखत असताना एकवेळ भुवनेश्‍वरने आक्रमकता दाखवत दडपण दूर केले आणि विजय साकार केला. या जोडीने नाबाद शंभर धावांची भागीदारी केली. धोनी ४५ तर भुवनेश्‍वर ५३ धावांवर नाबाद राहिला. 

त्यापूर्वी, श्रीलंकेच्या आघाडीच्या फळीतील फलंदाजांनी आपल्याकडे गुणवत्ता असल्याचे दाखवून दिले. पण, त्याचा फायदा करून घेण्यात त्यांना अपयश आले. त्यामुळे १ बाद ७० अशा १४व्या षटकांतील स्थितीनंतर त्यांचा डाव २९व्या षटकांत ५ बाद १२१ असा अडचणीत आला होता. 

त्या वेळी मिलिंदा सिरीवर्धना हा युवा खेळाडू खेळला नसता, तर त्यांची अवस्था अधिक बिकट झाली असती. त्याच्या संयमी खेळीने श्रीलंकेला तारले. फटक्‍यांची अचूक निवड करताना त्याने झळकावलेले अर्धशतक श्रीलंकेच्या डावाला आकार देण्यास नक्कीच सहाय्यक ठरले. त्याच्या खेळीमुळे श्रीलंका ५० षटकांत ८ बाद २३६ अशी धावसंख्या उभारू शकले. त्याला कापुगेदराने (४०) साथ दिली. या जोडीने सहाव्या विकेटसाठी ९१ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. श्रीलंकेच्या आघाडीतील प्रत्येक फलंदाजाने आश्‍वासक सुरवात केली. पण, त्यानंतर ते वीस चेंडूही खेळू शकले नाहीत. खेळपट्टी सहज होती. गोलंदाज प्रभाव पाडू शकत नव्हते. त्यामुळे खेळपट्टीवर टिकून राहणे महत्त्वाचे होते. हेच महत्त्व श्रीलंकेचे फलंदाज समजू शकले नाहीत. 

संक्षिप्त धावफलक -
श्रीलंका ५० षटकांत ८ बाद २३६ (मिलिंदा सिरीवर्धना ५८, चामरा कापुगेदरा ४०, जसप्रीत बुमरा ४-४३, युजवेंद्र चहल २-४३) पराभूत वि. भारत ४४.२ षटकांत ७ बाद २३१ (महेंद्रसिंह धोनी नाबाद  ४५, भुवनेश्‍वर नाबाद ५३, धनंजय ६-५२)

दृष्टिक्षेपात
महेंद्रसिंह धोनीचे ९९ यष्टिचीत, आघाडीवरील कुमार संगकारास गाठले
धोनीचे सर्वाधिक १९ यष्टिचीत हरभजनच्या गोलंदाजीवर. त्याखालोखाल रवींद्र जडेजा (१५) आणि अश्‍विन (१४)
जसप्रीत बुमराहने वन-डेत तिसऱ्यांदा चार विकेट घेण्याचा पराक्रम केला. 
नाणफेक जिंकल्यावर १५ पैकी १४ लढतीत कोहलीची धावांच्या पाठलागास पसंती


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news india sri lanka one day cricket match