भारत मार्चमध्ये श्रीलंकेत तिरंगी टी २० मालिका खेळणार

वृत्तसंस्था
Friday, 19 January 2018

नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघ मार्चमध्ये तिरंगी टी २० मालिकेत खेळणार आहे. विशेष म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा प्रदीर्घ दौरा २९ फेब्रुवारीस संपल्यानंतर लगेचच ही मालिका होणार आहे.  श्रीलंकेच्या स्वातंत्र्याला ७० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल या मालिकेचे आयोजन करण्यात आले असून, ६ मार्चपासून सुरू होणाऱ्या या मालिकेत बांगलादेश तिसरा संघ असेल. मालिकेतील सामने राउंड रॉबिन पद्धतीने खेळविले जातील. अव्वल दोन संघांत अंतिम सामना खेळविण्यात येईल. स्पर्धेतील सर्व सामने कोलंबोत प्रेमदासा मैदानावर होतील. या स्पर्धेच्या थेट प्रसारणाचे भारतातील अधिकार डी स्पोर्टस वाहिनीने मिळविले आहे. 

मालिकेचा कार्यक्रम ः श्रीलंका वि. भारत (६ मार्च), बांगलादेश वि. भारत (८ मार्च), श्रीलंका वि. बांगलादेश (१० मार्च), भारत वि. श्रीलंका (१२ मार्च), भारत वि. बांगलादेश (१४ मार्च), बांगलादेश वि. श्रीलंका (१६ मार्च) अंतिम सामना (१८ मार्च).

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news india srilanka T-20 Series cricket