मॅथ्यूज, चंडिमलने लंकेला सावरले

सुनंदन लेले
Tuesday, 5 December 2017

नवी दिल्ली - दिनेश चंडिमल आणि एंजेलो मॅथ्यूज या आजी-माजी कर्णधारांनी झळकाविलेल्या शतकांमुळे तिसऱ्या कसोटीत श्रीलंकेचा डाव सावरला गेला. प्रदूषणाच्या चक्रातून बाहेर पडत आज तिसऱ्या दिवसाचा खेळ पार पडला. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा श्रीलंकेने पहिल्या डावात ९ बाद ३५६ धावा केल्या. कर्णधार दिनेश चंडिमल १४७ धावांवर खेळत होता. 

तिसऱ्या दिवशीदेखील दिल्लीवर दाट धुक्‍याचे आणि प्रदूषणाचे सावट होते. अर्थात, त्याचा खेळावर परिणाम झाला नाही. मॅथ्यूज आणि कर्णधार चंडिमल यांनी जिगरबाज शतकी खेळी करून श्रीलंकेचा डाव सावरला.

भारतीय क्षेत्ररक्षकांनी पाच झेल सोडून त्यांना साथ दिली; पण अखेरच्या टप्प्यात त्यांची व्हायची ती घसरगुंडी झाली. सोमवारचा खेळ चालू होताना कोटला मैदानावर बऱ्यापैकी प्रदूषणाच्या दाट धुक्‍याची चादर पसरलेली होती. सकाळच्या सत्रात शमीने चांगलाच वेगवान तिखट मारा केला. बऱ्याच वेळा शमीने फलंदाजांना चकवले. वेगवान गोलंदाज थकल्यावर मॅथ्यूज - चंडिमलने फटकेबाजी चालू केली. उपहारानंतर मॅथ्यूज दोन वेळा बाद होताना वाचला. 

मॅथ्यूज ९८ धावांवर असताना दुसऱ्या स्लीपमधे उभ्या असलेल्या रोहित शर्माने सोपा झेल सोडला तेव्हा कमनशिबी गोलंदाज परत एकदा ईशांतच ठरला. त्यानंतर बदली खेळाडू शंकरने मॅथ्यूजचा झेल जडेजाच्या गोलंदाजीवर सोडला. शतकानंतर मॅथ्यूज अश्‍विनच्या गोलंदाजीवर बाद झाला तेव्हा यष्टिरक्षक वृद्धिमान साहाने त्याचा झेल टिपला. जवळपास ८० षटकांच्या मेहनतीनंतर गोलंदाजांना १८३ धावांची भागीदारी तोडण्यात यश आले.  

धावफलक
भारत -
 पहिला डाव - ७ बाद ५३६ (घोषित), श्रीलंका ः पहिला डाव ः (३ बाद १३१वरून) मॅथ्यूज झे. साहा गो. अश्‍विन १११ -२६८ चेंडू, १४ चौकार, २ षटकार, दिनेश चंडिमल खेळत आहे १४७ -३४१ चेंडू, १८ चौकार, १ षटकार, सदिरा समरविक्रमा झे. साहा गो. ईशांत ३३, रोशन सिल्वा झे. धवन गो. अश्‍विन ०, निरोशान डिकवेला त्रि. आर. अश्‍विन ०, सुरंगा लकमल झे. साहा गो. शमी ५, लाहिरू गमगे पायचित गो. जडेजा १, लक्षण संदाकन खेळत आहे ०, अवांतर १६ एकूण ३०० षटकांत ९ बाद ३५६
 
गडी बाद होण्याचा क्रम - ४-२५६, ५-३१७, ६-३१८, ७-३२२, ८-३३१, ९-३४३
गोलंदाजी - महंमद शमी २४-६-७४-२, ईशांत शर्मा २७-६-९३-२, रवींद्र जडेजा ४४-१३-८५-२, आर. अश्‍विन ३५-८-९०-३.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news india srilanka test cricket competition