पहिल्याच दिवशी श्रीलंकेच्या चारशे धावा

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 12 November 2017

कोलकता - भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत आव्हानाचा सामना करण्यासाठी सज्ज होणाऱ्या श्रीलंकेच्या संघाने सराव सामन्यातील पहिल्या दिवशी फलंदाजीचा मजबूत सराव केला. 

कोलकता - भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत आव्हानाचा सामना करण्यासाठी सज्ज होणाऱ्या श्रीलंकेच्या संघाने सराव सामन्यातील पहिल्या दिवशी फलंदाजीचा मजबूत सराव केला. 

अध्यक्षीय संघाविरुद्धच्या या सामन्यात त्यांनी एकाच दिवसात ४११ धावा उभारल्या. त्यांच्या चार फलंदाजांनी अर्धशतकी खेळी केल्या. कर्णधार संजू सॅमसन आणि जलज सक्‍सेना या दोन खेळाडूंचा अपवाद वगळता अध्यक्षीय संघाचे इतर खेळाडू एकदमच नवोदित आहेत. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या श्रीलंकेच्या समरविक्रमा करुणारत्ने यांनी १३४ धावांची सलामी दिल्यानंतर थिरीमने मात्र लवकर बाद झाला. पुनरागमन करणाऱ्या एंजेलो मॅथ्यूजनेही अर्धशतकी खेळी करून जम बसवला. डिकेवेलाने नाबाद ७३ धावांची खेळी साकार केली.

संक्षिप्त धावफलक - श्रीलंका - ८८ षटकांत ६ बाद ४११ (समरविक्रमा ७४, करुणारत्ने ५०, अंजेलो मॅथ्यूज निवृत्त ५४, डिकवेरा ७३, दिलरुवान परेरा ४८, संदीप वॉरियर २-६०, अक्ष भंडारी २-१११)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news india & srilanka test cricket match