भारतीय संघ वेस्ट इंडिजमध्ये दाखल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 जून 2017

पोर्ट ऑफ स्पेन (त्रिनिदाद) - भारतीय क्रिकेट संघ पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी बुधावारी विंडीजमध्ये दाखल झाला. वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार जेसन होल्डर याने हॉटेलमध्ये भारतीय खेळाडूंचे स्वागत केले.

होल्डर भारतीय कर्णधार कोहलीचे स्वागत करतानाचे छायाचित्रही वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळाने ट्‌विट केले आहे. अनिल कुंबळे यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यामुळे विंडीजमध्ये भारतीय संघ प्रशिक्षकाशिवाय आला असून, सपोर्ट स्टाफपैकी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर आणि क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर. श्रीधर हेच दोघे संघाबरोबर आहेत. कुंबळे यांनी भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी (ता. २३) होईल.

Web Title: sports news india team in west indies