ऑस्ट्रेलियाची भारतावर पुन्हा सरशी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 23 March 2018

मुंबई - महिला क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाने भारतावरचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. आजपासून सुरू झालेल्या तिरंगी टी-२० स्पर्धेत सलामीलाच ऑस्ट्रेलियाने भारताचा सहा विकेटने पराभव केला. 

भारताच्या मधल्या फळीची वाताहत कायम यावेळीही कायम राहिली. स्मृती मानधनाने ४१ चेंडूंत ६७ धावांचा तडाखा दिला. तिने मिताली राजसह ९.३ षटकांत ७२ धावांची सलामी दिली; मात्र त्यानंतरही भारताला २० षटकांत १५२ धावांपर्यंत मजल मारता आली. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने ११ चेंडू राखून चार फलंदाजांच्या मोबदल्यात लीलया पार केले.

भारतीयांची गोलंदाजी स्वैर होती. तब्बल २१ चौकार आणि एक षटकार मारण्यात आले. यामध्ये बेथ मुनी (४५) आणि विलानी (३९) आघाडीवर होते. या दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी ७९ धावांची भागीदारी करून भारताला विजयाचा विचारही करू दिला नाही.

स्मृती मानधनाने वनडे मधील फॉर्म आजही कायम ठेवत तिने ६७ धावांत ११ चौकार आणि दोन षटकार मारले. मानधना संघाच्या ९९ धावांवर बाद झाली आणि भारताच्या डावाला वेसण बसले. त्यानंतर अनुजा पाटीलने २१ चेंडूंत ३५ धावांचा तडाखा दिला आणि भारताला दीडशेचा उंबरठा पार करता आला. 

संक्षिप्त धावफलक 
भारत ः ५ बाद १५२ (मिताली राज १८, स्मृती मानधना ६७- ४१ चेंडू, ११ चौकार, २ षटकार, अनुजा पाटील ३५-२१ चेंडू, ६ चौकार, १ षटकार, अश्‍लेघ गार्डनर २-२२, ईलेस पेरी २-३१) पराभूत वि. १८.१ षटकांत ४ बाद १५६ (बेथ मूनी ४५- ३२ चेंडू, ८ चौकार, इलेस विलानी ३९, लेनिंग नाबाद ३५- २५ चेंडू, ४ चौकार, १ षटकार, जुलन गोस्वामी ३-३०)

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news india vs australia women cricket