भारताची मजबूत पकड

रविवार, 26 नोव्हेंबर 2017

नागपूर - विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा येथील खेळपट्टीवर भारतीय फिरकीपुढे श्रीलंकेच्या फलंदाजांनी नांगी टाकली. मात्र, जेव्हा भारतीय फलंदाज खेळण्यास आले, त्या वेळी श्रीलंकेच्या फिरकीला दबावही निर्माण करता आला नाही. पाहुण्या संघातील गोलंदाजांना दाद न देता मुरली विजय व चेतेश्‍वर पुजारा या जोडीने शतके झळकावून दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताला मजबूत स्थितीत पोचविले. श्रीलंकेच्या सर्वबाद २०५ या धावसंख्येला भारताने २ बाद ३१२ असे चोख उत्तर देऊन मालिकेत आघाडी घेण्याच्या दिशेने भक्‍कम पाऊल टाकले. विजय- पुजारा जोडीने द्विशतकी भागीदारी करताना अनेक विक्रमही नोंदविले. 

विजय आणि पुजाराने जवळ- जवळ पाच तास चिवट फलंदाजी करून श्रीलंकेच्या नवख्या गोलंदाजांना एकप्रकारे धडाच शिकविला. भारताकडे असलेली १०७ धावांची भागीदारी लक्षात घेता श्रीलंकेला ही कसोटी वाचविणे निश्‍चितच कठीण जाणार आहे. १ बाद ११ या धावसंख्येवरून पहिल्या डावाला सुरवात करणाऱ्या मुरली विजय व चेतेश्‍वर पुजाराने सकाळच्या सत्रात सावध फलंदाजी करताना ८६ धावा गोळा केल्या. उपाहाराला १ बाद ९७ अशा सुस्थितीत असलेल्या या दोघांनी त्यानंतरच्या सत्रातही धावांचा वेग कमी होऊ दिला नाही.   

कोलकता कसोटीत संघाबाहेर राहिलेल्या विजयने शिखर धवनच्या अनुपस्थितीचा पुरेपूर लाभ घेत करिअरमधील दहावे शतक झळकावून तिसऱ्या कसोटीसह दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठीही मजबूत दावा ठोकला. ५१ वा कसोटी सामना खेळणाऱ्या विजयने अकरा चौकार व एका षटकारासह २२१ चेंडूंत १२८ धावा फटकावल्या. त्याने पुजारासोबत २९५ मिनिटे चिवट फलंदाजी करीत दुसऱ्या गड्यासाठी ४३० चेंडूंत २०९ धावांची भागीदारी केली. या मैदानावरील दुसऱ्या गड्यासाठीची ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. दोघांनी आतापर्यंत एकूण दहा शतकी भागीदारी केल्या हे उल्लेखनीय.

 २०१७ मध्ये धर्मशाळा येथे शेवटचा कसोटी सामना खेळलेल्या विजयचे श्रीलंकेविरुद्धचे हे पहिलेच शतक होय. नोव्हेंबर २००८ मध्ये याच मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण करणाऱ्या विजयचे श्रीलंकेविरुद्धचे आणि नागपुरातीलही हे पहिलेच शतक ठरले. ही भागीदारी मोडीत काढण्यासाठी कर्णधार दिनेश चंडिमलने पाच गोलंदाज आळीपाळीने आजमावले. परंतु, विजय- पुजारा जोडीवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. अखेर हेराथने विजयला बाद करून लंकेसाठी डोकेदुखी ठरलेली ही भागीदारी मोडीत काढली. कारकिर्दीतील चौदावे शतक पूर्ण करणाऱ्या पुजाराने १३ चौकारांच्या मदतीने २८४ चेंडूंत नाबाद १२१ धावा केल्या. 

धावफलक
श्रीलंका पहिला डाव : २०५. भारत पहिला डाव : के. एल. राहुल त्रि. गो. गमगे ७, मुरली विजय झे. परेरा गो. हेराथ १२८, चेतेश्‍वर पुजारा खेळत आहे १२१, विराट कोहली खेळत आहे ५४, अवांतर २, एकूण ९८ षटकांत २ बाद ३१२. गडी बाद क्रम : १-७, २-२१६. गोलंदाजी : सुरंगा लकमल १८-२-५८-०, लाहिरू गमगे २२-७-४७-१, रंगना हेराथ २४-८-४५-१, दासून शनाका १३-३-४३-०, दिलरुवान परेरा २१-०-११७-०.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news india vs srilnaka