चहलने घेतली श्रीलंकेची फिरकी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 20 December 2017

युजवेंद्रसिंगच्या चार षटकांतील चार बळींनी विजय सुकर
कटक - युजवेंद्रसिंगने पहिल्या चार षटकांत श्रीलंकेचे चार फलंदाज बाद करीत श्रीलंकेच्या ट्‌वेंटी- 20 तील पराभवाची मालिका खंडित करण्याच्या आशांनाच हादरा दिला. भारताने ट्‌वेंटी- 20 मालिकेची यशस्वी सुरवात करताना पहिल्या लढतीत श्रीलंकेस 93 धावांनी सहज हरवले.

युजवेंद्रसिंगच्या चार षटकांतील चार बळींनी विजय सुकर
कटक - युजवेंद्रसिंगने पहिल्या चार षटकांत श्रीलंकेचे चार फलंदाज बाद करीत श्रीलंकेच्या ट्‌वेंटी- 20 तील पराभवाची मालिका खंडित करण्याच्या आशांनाच हादरा दिला. भारताने ट्‌वेंटी- 20 मालिकेची यशस्वी सुरवात करताना पहिल्या लढतीत श्रीलंकेस 93 धावांनी सहज हरवले.

शिखर धवनला विश्रांती दिल्यामुळे संघात आलेल्या केएल राहुलच्या अर्धशतकामुळे भारताने पावणेदोनशेचा पल्ला गाठला. अर्थात, भरवशाच्या धोनीने डावाच्या अखेरच्या षटकात भारताच्या धावगतीस वेग दिला. त्यामुळेच भारताच्या ट्‌वेंटी- 20 मधील सर्वांत मोठा विजय साकारला गेला. युजवेंद्रसिंग चहल पाचव्या षटकात पहिला बदली गोलंदाज म्हणून संघात आला. त्याने 1 बाद 39 वरून श्रीलंकेची अवस्था 6 बाद 62 करीत भारताचा विजय निश्‍चित केला. त्याने 16 चेंडूंत 23 धावांचा तडाखा दिलेला उपुल थरंगा आणि धोकादायक क्रेग मॅथ्यूजसह चौघांना केवळ 23 धावांच्या मोबदल्यात टिपले.

चहल गोलंदाजीस आल्यावर श्रीलंकेसाठी चौकार दुरापास्त झाले. आवश्‍यक धावगती नऊपेक्षा जास्त असताना त्यांना संपूर्ण डावात चार चौकार व दोनच षटकार मारता आले. दवात गोलंदाजी करणे टाळण्यासाठी श्रीलंकेने धावांचा पाठलाग करण्याचे ठरवले; पण मनगटाच्या साथीत चेंडूस चांगली फिरक देत चहलने श्रीलंकेचे कंबरडे मोडले. त्यानंतर लंका प्रतिकार करणार नाहीत, याची काळजी त्याने कुलदीप यादवच्या साथीत घेतली. त्यांनी अचूक दिशा व टप्पा राखत फलंदाजांना चुका करण्यास भाग पाडले. त्यामुळे आठव्या षटकात 2 बाद 46 वरून लंकेचा डाव 16 व्या षटकात 87 धावांत संपला.

संक्षिप्त धावफलक - भारत - 20 षटकांत 3 बाद 180 (रोहित शर्मा 17, केएल राहुल 61- 48 चेंडूंत 7 चौकार व 1 षटकार, श्रेयस अय्यर 24 - 20 चेंडूंत 3 चौकार, महेंद्रसिंह धोनी 39 - 22 चेंडूंत 4 चौकार व 1 षटकार, मनीष पांडे नाबाद 32 - 18 चेंडूंत 2 चौकार व 2 षटकार) वि.वि. श्रीलंका ः 16 षटकांत सर्वबाद 87 (निरोशन डिकवेला 13, उपुल थरंगा 23 - 16 चेंडूंत 1 चौकार व 2 षटकार, पेरेरा 19, चमारा 12, हार्दिक पंड्या 4-0-29-3, जयदेव उनाडकत 2-0-7-1, युजवेंद्रसिंग चहल 4-0-23-4, कुलदीप यादव 4-0-18-2).


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news india win 20-20 cricket match