पंड्या, पावसाने ऑस्ट्रेलियाला लोळवले

सकाळ वृत्तसेवा
Monday, 18 September 2017

पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा २६ धावांनी विजय
चेन्नई - आधी हार्दिक पंड्याची षटकारांची बरसात आणि त्यानंतर आलेल्या पावसाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाला लोळवले. भारताने हा सामना २६ धावांनी जिंकला.

नाणफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताचा डाव अडचणीतून हार्दिक पंड्याच्या (८३) फटकेबाजी आणि महेंद्रसिंह धोनीच्या (७९) संयमी खेळीने ७ बाद २८१ अशा आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत पोचला. त्यानंतर आलेल्या पावसाने ऑस्ट्रेलियासमोरील अडचणी वाढवल्या. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार ऑस्ट्रेलियासमोर २१ षटकांत १६४ धावांचे आव्हान ठेवण्यात आले. 

भारतीय फिरकी गोलंदाजीसमोर कठीण आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची अवस्था दयनीय झाली. ग्लेन मॅक्‍सवेलचा १८ चेंडूंतील ३९ धावांचा तडाखा आणि शेवटी जेम्स फॉकनरच्या प्रयत्नांमुळे ऑस्ट्रेलियाने सव्वाशेची मजल तरी मारता आली. त्यांचा डाव २१ षटकांत ९ बाद १३७ असा मर्यादित राहिला. 

त्यापूर्वी, सलामीचा फलंदाज अजिंक्‍य रहाणे (५) लवकर बाद झाला. कोहली आणि मनीष पांड्येला खातेही उघडता आले नाही. रोहित शर्मा मोठी खेळी उभारण्यात अपयशी ठरला. केदार जाधवचा धडाका पुढे जाऊन संथ पडला आणि भारत ५ बाद ८७ असे अडचणीत आला. त्या वेळी भारत दोनशेचा तरी टप्पा गाठणार का, अशी शंका उपस्थित झाली. पण, धोनीने खेळपट्टीवर उभे राहून सहकाऱ्यांना साथीला घेत भारताचे आव्हान उभे केले.

धोनीने स्वतःची विकेट राखून ठेवत हार्दिक पंड्याला स्वातंत्र्य दिले. त्याचा पुरेपूर फायदा उठवत त्याने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीच्या चिंधड्या उडवल्या. त्याने ६६ चेंडूंत  पाच चौकार, पाच षटकारांसह ८३ धावांची खेळी करताना धोनीसह ११८ धावा जोडल्या. पंड्या बाद झाल्यावर धोनीने भुवनेश्‍वरला साथीला घेत ७२ धावांची भर घातली. धोनी ७९ धावांवर बाद झाला.

संक्षिप्त धावफलक -
भारत ५० षटकांत ७ बाद २८१ (हार्दिक पंड्या ८३ -६६ चेंडू, ५ चौकार, ५ षटकार, महेंद्रसिंह धोनी ७९ -८८ चेंडू, ४ चौकार, २ षटकार, केदार जाधाव ४०, नॅथन कौल्टर नाईल ३-४४, मार्क्‍स स्टोईनिस २-५४) वि. वि. ऑस्ट्रेलिया ९ बाद १३७ (ग्लेन मॅक्‍सवेल ३९, जेम्स फॉकनर नाबाद ३२, युजवेंद्र चहल ३-३०, कुलदीप यादव २-३३, हर्दिक पंड्या २-२८)

थोडक्‍यात वन-डे
चौथ्यांदा हार्दिक पंड्याचे सलग तीन षटकार. दोनदा पाक, तर एकदा श्रीलंकेविरुद्ध

धोनीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतकांचे शतक

एकदिवसीय क्रिकेटमध्ये धोनीचे ३०२ सामन्यांत ६६वे अर्धशतक, ३३ अर्धशतके कसोटीत आणि टी २० मध्ये एक

अशी कामगिरी करणारा चौथा भारतीय. यापूर्वी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सौरभ गांगुली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news india win in cricket match