धवन, कोहलीचा घाव

सकाळ वृत्तसेवा
Monday, 21 August 2017

पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा श्रीलंकेवर सहज विजय

डम्बुला (श्रीलंका) - प्रथम गोलंदाजांनी फिरकी घेतल्यानंतर फलंदाजीत शिखर धवन आणि कर्णधार विराट कोहली यांनी निर्णायक घाव घालत भारताला पहिल्या एकदिवसीय सामन्यात रविवारी श्रीलंकेविरुद्ध नऊ गडी राखून सहज विजय मिळवून दिला. 

नाणेफेक जिंकून भारताने श्रीलंकेला फलंदाजी दिली. फिरकी गोलंदाजांनी कर्णधाराचा हा विश्‍वास सार्थ ठरवून श्रीलंकेचा डाव ४३.२ षटकांत २१६ धावांत गुंडाळला. त्यानंतर शिखर धवन आणि कर्णधार विराट कोहली यांनी सहज फलंदाजी करत भारताला २८.५ षटकांतच विजय मिळवून दिला. भारताने १ बाद २२० धावा केल्या.

भारताला श्रीलंकेचे आव्हान कधीच कठीण नव्हते. सलामीचा फलंदाज शिखर धवन आणि कर्णधार विराट कोहली यांनी अगदी सहज फलंदाजी केली. श्रीलंकेचा एकही गोलंदाज या दोघांना साधे अडचणीतही आणू शकला नाही. श्रीलंकेला रोहित शर्माला धावबाद करण्याचेच काय ते समाधान मिळाले. धवन आणि कोहली यांनी नाबाद १९७ धावांची भागीदारी केली.

सुरवातीपासून धावांचा भार वाहणाऱ्या धवनने ७१ चेंडूंत आपले ११वे शतक साजरे केल्यानंतर ९० चेंडूंत २० चौकार, ३ षटकारांसह नाबाद १३२ धावांची खेळी केली. कोहलीने ७० चेंडूंत १० चौकार आणि एका षटकारासह नाबाद ८२ धावांचे योगदान दिले. 

त्यापूर्वी, प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा भारतीय फिरकी गोलंदाजांसमोर शरणागती पत्करली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी मिळाल्यानंतर त्यांचा डाव २१६ धावांत संपेपर्यंतचे चित्र बघितले, तर केवळ त्यांच्या पहिल्या पाच फलंदाजांना खेळपट्टीवर टिकायचे होते, असे वाटले. अन्य फलंदाज खेळपट्टीवर केवळ हजेरी लावून परतले. अखेरच्या सहा फलंदाजांना तर दोन आकडी मजलही शक्‍य झाली नाही. त्यामुळेच २५व्या षटकांत १ बाद १३९ अशा स्थितीनंतर त्यांचा डाव २१६ धावांत संपुष्टात आला. 

पार्ट-टाइम फिरकी गोलंदाज केदार जाधव याने श्रीलंकेच्या निरोशान डिकवेला आणि कर्णधार उपूल थरंगा यांना बाद करून जणू श्रीलंकेच्या आव्हानातील हवाच काढून घेतली. त्यानंतर अक्षर पटेल याने दौऱ्यातील पहिल्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाल्यावर ३४ धावांत ३ गडी बाद करून आपली छाप पाडली. भारताचे वेगवान गोलंदाज काहीच करामत दाखवू शकले नाहीत. तीन वेगवान गोलंदाजांनी मिळून डावातील केवळ १८ षटके टाकली; पण फिरकीच्या २५ षटकांत श्रीलंकेच्या डावाची घसरगुंडी उडाली. 

संक्षिप्त धावफलक 
श्रीलंका ४३.२ षटकांत सर्वबाद २१६ (निरोशान डिकवेला ६४, दनुष्का गुणतिलका ३५, कुशल मेंडिस ३६, एंजेलो मॅथ्यूज नाबाद ३६, अक्षर पटेल ३-३४, केदार जाधव २-२६, युजवेंद्र चहल २-६०, जसप्रीत बुमरा २-२२). पराभूत वि. भारत २८.५ षटकांत १ बाद २२० (धवन नाबाद १३२ (९० चेंडू, २० चौकार, ३ षटकार), विराट कोहली नाबाद ८२ (७० चेंडू, १० चौकार, १ षटकार)

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news india win one day cricket match