लुटुपुटुच्या सामन्यासह भारताने मालिका जिंकली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

तिसऱ्या टी-२० सामन्यात गोलंदाजांच्या अचूक कामगिरीने विजय सुकर
तिरुअनंतपुरम - पावसाच्या व्यत्ययानंतर ग्राउंडसमनच्या अथक प्रयत्नांनी खेळविण्यात आलेल्या आठ षटकांच्या सामन्यात भारताने सहा धावांनी विजय मिळवून तीन टी-२० सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने ५ बाद ६७ धावा केल्या. आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडला डावात ६ बाद ६१ धावांचीच मजल मारता आली.

यावेळी न्यूझीलंडच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजीसमोर स्वातंत्र्य घेता आले नाही. भारताच्या गोलंदाजांनीदेखील अचूकता राखत न्यूझीलंडच्या फलंदाजांना जखडून ठेवले. फिरकी गोलंदाजांचे यशही उल्लेखनीय ठरले. चेंडूला अधिक उंची न देण्याचे भारतीय गोलंदाजांचे प्रयत्न यशस्वी ठरले. फटकेबाजीच्या नादात न्यूझीलंडच्या केवळ ग्लेन फिलिप्स आणि कॉलिन ग्रॅंडहोम यांनाच दोन आकडी मजल मारता आली. बुमरा आणि युजवेंद्र चहल यांनी गोलंदाजीत कमालीची अचूकता राखली.

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मात्र, न्यूझीलंडच्या अचूक गोलंदाजीला तेवढ्याच भक्कम क्षेत्ररक्षणाची साथ मिळाल्याने भारतीय फलंदाजांना फार काही करता आले नाही. कर्णधार विराट कोहली, मनीष पांडे, हार्दिक पंड्या यांच्या आक्रमक फलंदाजीने त्यांना माफक ६७ धावांचीच मजल मारता आली. न्यूझीलंडच्या गोलंदाजांपेक्षा त्यांच्या क्षेत्ररक्षकांनी दाखवलेल्या चपळपणामुळेच भारताचा डाव मर्यादित राहिला. 

संक्षिप्त धावफलक -
भारत ८ षटकांत ५ बाद ६७ (विराट कोहली १३, मनीष पांडे १७, हार्दिक पंड्या नाबाद १४, टीम साऊदी २-१३, ईश सोधी २-२३) वि.वि. न्यूझीलंड ६ बाद ६१ (ग्रॅंडहोम नाबाद १७, सॅंटनेर नाबाद ३, जसप्रीत बुमरा २-९).

Web Title: sports news india win t-20 cricket series