गैरवर्तनामुळे विराटला शिक्षा

पीटीआय
Wednesday, 17 January 2018

सेंच्युरियन - पंचांशी हुज्जत घातल्यामुळे भारतीय कर्णधार विराट कोहलीवर सौम्य स्तरावरची (लेव्हल १) कारवाई करण्यात आली. तरीही क्रमवारीतील त्याचा एक गुण कमी होणार आहे आणि सामना मानधनातील २५ टक्के रक्कम कापण्यात येणार आहे. त्याने केलेल्या गुन्ह्यात एरवी ५० टक्के आणि दोन गुणांची कपात अशी शिक्षा आहे. चालू कसोटीत दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात २५ व्या षटकात पंचांनी चेंडूबाबत तक्रार न ऐकल्याने कोहलीने रागाने चेंडू मैदानावर आपटलाही होता. कोहलीने चूक मान्य केल्यामुळे पुढील कारवाई होणार नाही, असे सामनाधिकारा ब्रॉड यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news Indian captain virat kohli abusiveness cricket sports